
Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण
बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या फॅशनमुळचं नव्हे तर तिच्या सडेतोड उत्तरानंही ती समोरच्याची बोलतीच बंद करते.
उर्फी जावेदने तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्समुळे स्वत:चे नाव कमावले आहे. ती अनेकदा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली आहे. यासाठी उर्फीला ट्रोल व्हावे लागले. पण सध्या तर सोशल मीडियावर उर्फी जावेद वेगळाच मुद्दा बनला आहे.
हेही वाचा: Urfi Javed: इच्छा पुर्ण...शेवटी उर्फीला बेड्या ठोकल्याचं!
तिच्या फॅशन बद्दल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्याविरूद्ध तक्रार केली. मुंबईच्या रस्त्यांवर नंगटपणा करत असल्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला. मात्र उर्फीने ती पूर्ण कपडे का घालत नाही या मागचं कारणं स्पष्ट केलं.
उर्फी जावेदने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या शरीरावर आलेले पुरळ दाखविले आहे. तिच्या हातावर आणि पायावर खूप पुरळ उठले आहेत, त्यामुळे उर्फी खूप अस्वस्थ आहे.

Urfi Javed

Urfi Javed
हेही वाचा: Bigg Boss 16: 'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...
उर्फी जावेदने सांगितले की, तिच्या शरीराला कपड्यांची अॅलर्जी आहे. तिने पूर्ण कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर तिला पुरळ उठतात. उर्फी म्हणाली, "मी कपडे का घालत नाही, कारण माझी प्रकृती गंभीर आहे. जेव्हा मी पूर्ण कपडे घालते तेव्हा माझे शरीरावर लगेच असे पॅच येतात."

Urfi Javed
उर्फीने आतपर्यंत तिच्या फॅशनमध्ये मोबाईल, प्लेट, मच्छरदानी, उलटा शर्ट, गोणी, फोटो कॉपी, , सिम कार्ड अशी न संपणारी लिस्टआहे. या सगळ्यांचा वापर करून ड्रेस तयार केला आहे.
हेही वाचा: Subodh Bhave: बोलून कंटाळलो आता! सुबोध भावेची राज्य सरकार वर तीव्र नाराजी.. म्हणाला,