Salman Khan News | Salman Khan on Lawrence Bishnoi  esakal
मनोरंजन

Salman Khan: 'अरे कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? मी नाही ओळखत!'

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली अन् बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली.

युगंधर ताजणे

Salman Khan Lawrence Bishnoi Case: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली अन् बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. लाखो भारतीय प्रेक्षकांचा आवडता अभिनेता असणाऱ्या सलमानच्या घराभोवती मुंबई पोलिसांचा पहारा उभा करण्यात आला. त्याची (entertainement news) चौकशी सुरु झाली. सलमान आणि त्याचे वडील हे रोज सकाळी ज्याठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात तिथल्या एका जागी चिठ्ठी त्यांना (Social media news) आढळून आली. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सलमानच्या चाहत्यांनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी तातडीनं हायप्रोफाईल केस म्हणून तपासाला सुरुवात केली. सलमानकडे जी चौकशी करण्यात आली त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

(Mumbai police) मुंबई पोलिसांनी सलमानकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यात त्यानं सांगितलं की, मला हा लॉरेन्स बिष्णोई कोण आहे याविषयी काहीही माहिती नाही. माझा कुणावरही संशय नाही. त्यामुळे मला आणखी काही सांगता येणार (salman khan) नाही. गोल्डी बरार कोण आहे हेही मला माहिती नसल्याचे सलमाननं सांगितलं आहे. मला आणि माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी (Bollywood News) देण्यात आली. ती आम्हाला का दिली याविषयी देखील काही सांगता येणार नाही. माझे वडील सलीम खान यांच्याकडे ते पत्र आलं तेव्हा आम्ही घाबरुन गेलो. या चिठ्ठीच्या संदर्भात पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लॉ़रेन्सनं आपला या चिठ्ठीशी कसलाच संबंध नसल्याचे सांगितले आहे.

सिद्धु मुसेवाला हत्याकांड प्रकरणात बिश्नोईचे नाव समोर आले होते. त्यानंतर सलमानला जीवे मारण्याची मिळालेली धमकी या साऱ्याचा काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली आहे. टाइम्स नाऊमध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, सलमाननं आपण कोणत्याही गोल्डी किंवा लॉरेन्सला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. बाकीच्या व्यक्ती जेवढं त्यांना ओळखतात तितकीच माहिती मला त्यांच्याविषयी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५०० कोटींचं प्रकरण केंद्राकडे? मोदींना पत्र, शिंदेंच्या नेत्यांकडून फडणवीसांची भेट! जरांगेंनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ९ जण कोण?

Satara News: जलमंदिर पॅलेसवर रवींद्र चव्हाण यांचे स्वागत; उदयनराजेंकडून शिवरायांचे शिल्प देऊन सत्कार

China Earthquake : तिबेट नंतर आता चीन, पाकिस्तान अन् अफगाणिस्तानही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; बचावकार्य तातडीने सुरू, बर्फवृष्टीचे संकट

Marathi News Live Updates : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विवेकानंदनगरमधील महापालिका हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची लगबग

Jaywant Sugar: ‘जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT