Manish Malhotra Diwali Party Esakal
मनोरंजन

Manish Malhotra: तारे जमीन पर! सलमान पासून ऐश्वर्यापर्यंत; मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत जमलं अख्खं बॉलिवूड!

Vaishali Patil

Manish Malhotra Diwali Party: देशात सर्वत्र दिवाळीच्या तयारीला वेग आला आहे. सर्वत्र दिवाळीचे प्रसन्न वातावरण झाले असून दिवाळीची क्रेझ सर्वांमध्ये दिसून येत आहे. त्यातच बॉलिवूड कलाकारामंध्येही दिवाळीचे सेलिब्रेशन हे दरवर्षी खुपच खास असते. बरेच सेलेब्स आपल्या घरी दिवाळीची पार्टी आयोजित करत असतात.

आता बॉलिवूड सेलेब्सच्या पार्टीची सुरुवात झाली आहे ती डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीने. काल संध्याकाळी मनीष मल्होत्राने सर्व कलाकारांसाठी दिवाळी पार्टी आयोजित केली होती.

या पार्टीत बॉलिवूडचे बडे स्टार्स दिसले. या पार्टीत ऐश्वर्या राय, भूमी पेडणेकर, सलमान खान, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीसह अनेक स्टार्सने हजेरी लावली.

यासोबतच रेखा, गौरी खान, रवीना टंडन, अर्जुन कपूर, सारा अली खान, जान्हवी आणि खुशी कपूर, सुहाना खान यांच्यासह अनेक स्टार्सने मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीत आपल्या सौंदर्याने चार चांद लावले.

या खास पार्टीत मनीष मल्होत्रा ​​हा काळ्या कुर्ता आणि पँटमध्ये स्टायलिश दिसत होता. मनीषने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात आणि पार्टीत कलाकारांचे स्वागत केले.

तर या पार्टीत सोनम कपूर सोनेरी रंगाची प्लेन साडीमध्ये अतिशय साधी आणि सुंदरमध्ये दिसत होती.

तर रेखानं नेहमीप्रमाणे सोनेरी आणि काळ्या रंगाच्या साडीत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. यावेळी डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही गोल्डन आणि ग्रे कलरच्या नेट गाऊनमध्ये दिसली.

बॉलिवूडमधील रोमँटिक कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीही दिवाळी पार्टीत हेजेरी लावली.

दिवाळी पार्टीत सारा अली खानने पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता तर जान्हवी कपूरने हेवी गोल्डन कलरचा लेहेंगा घातला होता.

तर मनीषच्या पार्टीत ऐश्वर्या राय गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पलाझो परिधान करून पोहोचली होती.

तर मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान खानही पोहोचला होता. त्याने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती. तर दिग्दर्शक करण जोहर या दिवाळी पार्टी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला.

या पार्टीत नीता अंबानी त्यांची होणारी सून राधिकासोबत दिसल्या. यावेळी निता यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती तर राधिकाने क्रीम रंगाचा हेवी वर्क पलाझो आणि क्रॉप टॉप परिधान केला होता.

सध्या या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT