ranveer singh mom file image
मनोरंजन

रणवीर सिंगचा आईसोबत जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

रणवीरची आई अंजू भवनानी यांच्या डान्सचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्रियांका कुलकर्णी

हिंदी चित्रपटसृष्टमध्ये आपल्या स्टाइल, डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. फण सध्या रणवीर वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. रणवीरची आई अंजू भवनानी (Anju Bhavnani) यांच्या डान्सचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर आणि त्याच्या आईच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

रक्षाबंधनच्या दिवशी अंजू यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणवीर सिंगचे पूर्ण कुटुंब एका आलिशान हॉटेलमध्ये गेले होते. अंजू आणि रणवीर यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील दिल चोरी या गाण्यावर देखील अंजू आणि रणवीरने डान्स केला. तसेच रणवीरने पत्नी दीपिका पदूकोनसोबत 'नशे सी चढ गई' या गाण्यावर देखील डान्स केला. यावेळी रणवीरने आईसाठी 'बार बार दिन ये आए' हे गाणे देखील गायले. रणवीरने त्याच्या वडीलांसोबत 'पद्मावत' चित्रपटातील खलीबली या गाण्यावर डान्स केला.

रणवीर लवकरच '83' या चित्रपटामध्ये क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच रणवीरच्या 'सर्कस', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'सूर्यवंशी आणि 'तख्त' या आगामी चित्रपटांबद्दल देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT