boyz 4 teaser onkar bhojane missing in teaser netizens comments viral gaurav more SAKAL
मनोरंजन

Boyz 4 Teaser: ओंकार भोजने कुठेय? बॉईज 4 चा टीझर झक्कास पण प्रेक्षकांची मात्र निराशा

बॉईज 4 चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

Devendra Jadhav

Boyz 4 Teaser: सध्या सर्वांना उत्सुकता आहे बॉईज 4 सिनेमाची. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा गौरव मोरे, निखिल बने सोबतच बॉईज सिनेमाचे जुने नवे कलाकार एकत्र असणार आहेत.

बॉईज 4 चा टीझर काल रात्री प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा टीझर सर्वांना आवडला, पण ओंकार भोजने नसल्याने प्रेक्षकांची काहीशी निराशाही झालेली दिसून येतेय.

ओंकार भोजने शिवाय बॉईज ला मजा नाय

बॉईज 4 चा टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. सर्वांनी या टीझरला पसंती दर्शवली. पण टीझरमध्ये ओंकार भोजने नसल्याने प्रेक्षकांची काहीशी निराशा झालेली पाहायला मिळतेय.

ओंकार भोजने याआधी बॉईज 2, बॉईज 3 या सिनेमात झळकला. ओंकार भोजनेने सिनेमात नरु भोंडवे ही व्यक्तिरेखा साकारली. कॉमेडी खलनायक म्हणून या ओंकार भोजनेच्या नरु भोंडवेची ओळख आहे. पण बॉईज 4 मध्ये ओंकार भोजने नसल्याने प्रेक्षक मात्र निराश झाले आहे.

आम्हाला ओंकार भोजने पाहीजे

ओंकार भोजने कुठेय?, नरु भोंडवे कुठेय?, ओंकार भोजने ट्रेलरमध्ये मिसींग आहे, ओंकार भोजने का नाही या मूव्ही मध्ये?, नरु शेट पाहीजे राव?

अशा कमेंट करत ओंकार भोजने सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नाही म्हणून प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. आता ओंकार भोजने सिनेमात आहे की नाही? हे सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच कळेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : विद्यार्थ्याच्या कपाळावरील टिळा काढल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात FIR; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

OBC Reservation Latest Update : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर मैदानात उतरून लढू; मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला थेट इशारा

MONEY LUCK: सप्टेंबरमध्ये पैशांची कमतरता भासणार नाही! ‘या’ राशींवर होणार धनाचा वर्षाव; तिजोरी भरभरून भरणार, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: दहीहंडी उत्सवामुळे मंडई मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गात तात्पुरता बदल

IND vs PAK: आज पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने; स्मृती मानधनाचा फॉर्म निर्णायक ठरणार, हरमनप्रीत कौरकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा

SCROLL FOR NEXT