
Gautami Patil Interview Social media : गौतमी पाटील या नावानं आता महाराष्ट्राला वेडं लावलं आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा नसेल जिथे गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम पार पडला नसेल. आता गौतमी ही मनोरंजन विश्वातील एक मोठं नावं झालं आहे. मराठी सेलिब्रेटींइतकी क्रेझ गौतमीच्या नावाची आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझानं गौतमी पाटीलची मुलाखत घेऊन तिला वेगवेगळ्या गोष्टींवर बोलते केले. त्यावेळी गौतमीनं तिच्या बालपणापासूनच्या प्रवासाला उजाळा देत आतापर्यतचा संघर्ष किती वेदनादायी होता हे सांगितले. यावेळी तिनं तिच्यावर जी टीका केली जाते, त्या टीकाकारांना देखील जशास तसे उत्तर दिले आहे. गौतमीची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे.
Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'
गौतमी तू लावणी करत नाहीस, तुझ्या डान्सवरुन नेहमीच वाद होताना दिसतो,याविषयी तू काय सांगशील, असा गौतमीला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं सांगितलं की, मी अजून किती सोबर असावं, मला तुम्ही सांगा की मी कुठे चुकते, आज मी एकच कलाकार नाही, फक्त गौतमी पाटील का म्हणते, मी काही जास्त पैसे घेत नाही, तुम्ही कन्फर्म करा मला किती पैसे मिळतात ते, मला कार्यक्रम मिळतात ते मी घेते, मी कुणाच्या पोटावर पाय देत नाही. मला दिवसाला शंभर फोन येतात. वेगळ्या जिल्ह्यातून येतात.
जे माझ्यावर आरोप करतात त्यांनी सांगावे माझे काय चुकते, काहीही बोलतात, कुणामुळे माझे मन दुखायला नको याची मी काळजी करते. माझे प्रेक्षक आहेत त्यांचे मनोरंजन करणे माझे काम आहे. बरेच कलाकारही वेगळ्या पद्धतीनं वागतात. मग फक्त गौतमी पाटीललाच का बोलता?
गौतमीनं लावणीविषयी सांगितले की, मी कधीच लावणी केली नाही. मी लावणीची वेशभूषाही केली नाही. लोकगीतांच्या सादरीकरणाच्या वेळेस मी साडी घातली. खरं सांगायचं तर मला लावणीही येत नाही. गाणं लागलं तसे मी नाचत होते. मी वेस्टर्न डान्सर आहे. हे अजूनही लक्षात घ्या. त्यामुळे मला दरवेळी लावणीवरुन बोलणाऱ्यांना मी काही गोष्टी ठामपणे सांगू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.