मनोरंजन

अखेर ठरलं! 'या' तारखेपासून मराठी रामायणाचे प्रसारण सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः निर्माते व दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेने दूरदर्शनवर मोठा  इतिहास रचला होता. तीसेक वर्षांपूर्वी आलेली ही मालिका कमालीची लोकप्रिय ठरली होती.

त्यामुळे सध्याच्या कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनमध्ये दूरदर्शनने पुन्हा ही मालिका दाखविण्याचा निर्णय घेतला आणि काय...पुन्हा या मालिकेने इतिहास रचला. दूरदर्शनला या मालिकेने नंबर वनवर आणले शिवाय सगळ्या मालिकांमध्ये ही मालिका नंबर वन ठरली. आता हीच मालिका मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर ११ जूनपासून रात्री नऊ वाजता ही मालिका दाखविण्यात येणार आहे.

रामायण व महाभारत या पौराणिक मालिकांनी दूरदर्शनवर खूम लोकप्रियता मिळविली. या मालिका सुरू झाल्या की रस्ते  सुनसान व्हायचे. महिला वर्ग हातातील काम बाजूला ठेवून टीव्हीसमोर बसायचा. या मालिकांची तेव्हाची ही लोकप्रियता पाहता दूरदर्शनने आता लाॅकडाऊनमध्ये या मालिका पुन्हा आणल्या. त्यानंतर काही खासगी वाहिन्यांनीदेखील या मालिका दाखविण्यास सुरुवात केली. मात्र आता रामायण मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. याविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’ या महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीने कुशची भूमिका साकारली होती.

 मराठीतून सुरू होणाऱ्या रामायणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

स्वप्नील पाठोपाठ सतीश राजवाडेंनीही थांबवला चालू नाटकाचा प्रयोग, 'हे' होतं कारण !

Revdanda Bridge : कोकणचा प्रवास होणार सुपरफास्ट! 1200 कोटींच्या रेवदंडा खाडीपुलाच्या कामाला वेग; वळसा घालून जाण्याचा फेरा वाचणार, कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प?

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT