राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंदच; राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही... 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचनाद्वारे देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले. काही राज्यामध्ये सोमवारपासून मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे सुरू होत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मुंबई : केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचनाद्वारे देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले. काही राज्यामध्ये सोमवारपासून मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे सुरू होत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यासह मुंबईतील सिद्धीविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिर आणि मशिदी , चर्च, गुरूद्वारा बंदच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांना देवदर्शन अजूनही दूरच आहे. घरातून भाविकांनी देवपूजन, नमाज व प्रार्थना करावी लागणार आहे.

वाचा ः लॉकडाऊन शिथिल होताच मुंबईत 'इथे' झाली वाहनांची तोबा गर्दी; मात्र कारण तरी काय?

केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचनांद्वारे देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, याचा निर्णय संबंधित राज्यांनी त्यांच्याकडील कोरोनाची परिस्थिती पाहून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत कोणतीही मार्गदर्शन सूचना जारी केल्या नाहीत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. धार्मिकस्थळे सुरू केली तर तेथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने तेथे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहे. 

वाचा ः नवी मुंबईत अत्याधुनिक कोरोना रुग्णालय; वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील काम अंतिम टप्प्यात 

तसेच प्रत्येक धर्माचे धर्मगुरू राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करत आहेत. राज्य सरकार ज्यावेळी धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी देतील त्यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ती खुली केली जातील, असे मंदिर प्रशासन व चर्च, मशिदी , गुरूद्वारा येथील धर्मगुरू आणि प्रशासनाचे म्हणणे आहे. महालक्ष्मी मंदिर प्रशासनाने शरचंद्र पाध्ये म्हणाले, केंद्राने मार्गदर्शन सूचना दिल्या व परवानगी दिली पण राज्य सरकारने अजून परवानगी दिली नाही. त्यामुळे मंदिर बंदच राहील. जेव्हा राज्य सरकार परवानगी देईल तेव्हा सर्व अटी व नियमांचे पालन करून मंदिर भाविकांना खुली होतील. 

वाचा ः लॉकडाऊनचा असाही फायदा; दिवा लेव्हल क्रॉसिंगचे काम दोन आठवड्यात पूर्ण

मशिदी खुले करण्याबाबत मौलाना काश्मिरी म्हणाले, केंद्राची परवानगी आहे पण जोपर्यंत राज्य सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत मशिदी या बंदच राहणार आहेत. राज्य सरकारला पूर्णतः आम्ही सहकार्य करत आहोत. राज्य सरकारची परवानगी नाही त्यामुळे चर्चही बंदच राहणार आहे, सरकारच्या निर्णयाला आमचा कायम पाठिंबा आहे, असे फादर रिचर्ड डबरे म्हणाले. गुरूद्वारा बंदच राहणार आहे, राज्य सराकर परवानगी देईल तेव्हा गुरूद्वारा उघडण्यात येईल, असे महाराष्ट्र शीख असोसिएशन दलजीत सिंग यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temples, mosque, church in maharashtra still closed till statte govt guidelines