Dcm Ajit Pawar watch 'SatyaShodhak' movie based on Mahatma Phule's life SAKAL
मनोरंजन

DCM Ajit Pawar: महात्मा फुलेंच्या विचारांचे प्रतीक असलेली पगडी, उपमुख्यमंत्र्यांनी पाहिला 'सत्यशोधक'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारीत सत्यशोधक सिनेमा पाहिलाय

Devendra Jadhav

DCM Ajit Pawar Satyashodhak Movie: महात्मा फुलेंच्या आयुष्यावर आधारित 'सत्यशोधक' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा उद्या ५ जानेवारीला सगळीकडे रिलीज होणार आहे. सत्यशोधक सिनेमाची टीम सध्या विविध राजकीय व्यक्तींना भेटून सिनेमाचं प्रमोशन करत आहे.

अशातच 'सत्यशोधक' सिनेमाची टीम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

अजित पवार यांची सत्यशोधक टीमने घेतली भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सत्यशोधक' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या समतेच्या विचारांची प्रतीक असलेली पगडी अजितदादांना देण्यात आली.
यावेळी सिनेमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणारे कलाकार संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे उपस्थित होते.

सत्यशोधक सिनेमाला रिलीजआधीच अनेक पुरस्कार

‘विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या म‌. ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच साकारणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील.

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म या पुरस्काराने तर, जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला.

सत्यशोधक सिनेमाची उत्सुकता

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक सिनेमा आधी १० नोव्हेंबरला रिलीज होणार होता. आता सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे.

रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT