Ira Khan Wedding: लेकीच्या लग्नात आमिरने केला 'या' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

लेक आयराच्या लग्नात आमिरने खास डान्स केलाय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय
aamir khan dance at ira khan wedding song  Meri Pyari Behaniya Banegi Dulhaniya
aamir khan dance at ira khan wedding song Meri Pyari Behaniya Banegi DulhaniyaSAKAL

Aamir khan Dance at Ira Khan Wedding: आमिर खानची लेक आयरा खानचं काल ३ जानेवारीला लग्न झालं. या लग्नाचे फोटो - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

आयराने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर असलेल्या नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. आयराच्या लग्नातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत आमिर त्याच्या कुटुंबासोबत डान्स करताना दिसतोय.

aamir khan dance at ira khan wedding song  Meri Pyari Behaniya Banegi Dulhaniya
Neha Pendse: अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरातून ६ लाखांचे दागिने चोरीला, 'या' जवळच्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

आयराच्या लग्नात आमिर थिरकला

आयराच्या लग्नविधींचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. तरी या लेटेस्ट व्हिडिओमध्ये आमिर खान 'मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया' गाण्यावर डान्स करताना दिसला.

आमिर आणि त्याची एक्स पत्नी 'मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया'वर लग्नातील पाहुण्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ हळदी समारंभाचा असल्याचं समजतंय. ज्यामध्ये आमिर खान काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये किरण रावसोबत डान्स करत आहे.

आयरा आणि नुपुरचं लग्न

आयरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. आयरा खान आणि नुपूर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एंगेजमेंट केली होती. नुपूर हा आमिर खानचा ट्रेनर आहे. जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा नुपूरने तिला त्यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.

कोण आहे आयराचा नवरा नुपुर?

आयरा खानचा पती नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो आयरालाही फिटनेस ट्रेनिंग देत होता.

यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. नुपूर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर हे दोघीही एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. दोघांचं लग्न झाल्याने त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com