Death threat received to Pooja Hegde after heated argument in dubai what really happened?  SAKAL
मनोरंजन

Pooja Hegde: पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी, काय घडलं नेमकं?

अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सर्वांना धक्का बसलाय

Devendra Jadhav

Pooja Hegde Death Threat: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी समोर येतेय.

विरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सांगितल्यानुसार, दुबईमध्ये एका क्लबमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पूजाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या.

विरल भयानीने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा दुबईला क्लबच्या उद्घाटनासाठी गेली होती. पण तिथे तिचा जोरदार वादा झाला. हा वाद नेमका कशावरुन झाला हे मात्र अद्याप कळू शकलं नाही. सध्या पूजाने भारतात परतण्याचा निर्णय घेतलाय. पूजा हेगडेच्या टीमकडून अधिकृत निवेदनाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

ही बातमी ऐकताच पूजाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी काळजी दर्शवली आहे.

वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर.. पूजा हेगडे शेवटची सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसली होती. या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यात अपयशी ठरला. पूजा आता आगामी देवा सिनेमात अभिनय करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 11 ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे.

देवा या बिग बजेट सिनेमासोबत पूजा हेगडे आगामी मल्टीस्टारर हाऊसफुल 5 आहे. हाऊसफुल्ल 5 मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, क्रिती सॅनन, क्रिती खरबंदा, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि चंकी पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चाहते हाऊसफुल्ल 5 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पूजाला आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचं प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT