Ravindra Berde: अभिनयने शेअर केला रविंद्र बेर्डे यांचा शेवटचा फोटो, वडिलांनंतर काकांचे छत्र हरपल्यानं भावूक

रविंद्र बेर्डे यांचं आज निधन झालं
abhinay berde shared ravindra berde last photo before death with swanandi berde
abhinay berde shared ravindra berde last photo before death with swanandi berde SAKAL

Ravindra Berde Death News: ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालंय. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रविंद्र हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते.

अशातच रविंद्र यांचा पुतण्या म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डेने काका रविंद्र यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

abhinay berde shared ravindra berde last photo before death with swanandi berde
Santosh Chordia: पुण्यातील रसिकांना खळखळून हसवणारे प्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया यांचं निधन

अभिनयने शेअर केला काकांचा फोटो

रविंद्र बेर्डे यांचा एक फोटो अभिनयने शेअर केलाय. यात अभिनय आणि स्वानंदी दिसत असुन त्यांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवलाय.

रविंद्र यांनी सुद्धा फोटोसाठी स्माईल दिलेली दिसत असुन ते काहीसे आजारी दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन अभिनयने काकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने शोककळा

रविंद्र गेले अनेक दिवस त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. पुढे उपचार घेऊन घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी 1965 मध्ये रंगभूमीवर पदार्पण केलं.

300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.


रविंद्र बेर्डे यांचे चित्रपट

अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांची जोडीला पडद्यावर खूप प्रेम मिळालं होतं. अनेक प्रकारच्या पात्रांनी त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले.

रवींद्र मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 1995 मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर 2011 साली त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com