Ranveer Singh- Deepika Padukone Esakal
मनोरंजन

Deepika Padukone: लवकरच आई होणार? दीपिकाने अखेर खुलासा केलाच, म्हणाली, "रणवीर आणि मला मुलं.."

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आता लवकरच आई बाबा होण्याच्या तयारीत आहेत.

Vaishali Patil

Deepika Padukone On Family Planning: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते. तिने आजवर अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे.

यंदाच्या वर्षी दीपिका अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. यावर्षी सुरुवातीला दीपिका ‘फायटर’ या ॲक्शनपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तर आता दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. दोघांची जोडी नेहमी चर्चेत असते. संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला राम लीला' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले आणि तिथेच त्याच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आता लवकरच आई बाबा होण्याच्या तयारीत आहेत. दीपिकाने आता एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ती आता रणवीरसोबत फॅमिली प्लॅन करण्याचा विचार करत आहे.

एका मुलाखतीत दीपिका म्हणाली, “रणवीर आणि मला मुलं खूप आवडतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबाची सुरुवात करु. मी ज्याच्यासोबत लहानाची मोठी झाली अशा माझ्या जवळच्या व्यक्तीना म्हणजे काकू, काका, कौटुंबिक मित्रांना भेटते तेव्हा ते नेहमी सांगतात.

दीपिका म्हणाली की, 'माझे कुटुंब मला खुप ग्राउंड ठेवते आणि मला वाटते की आम्ही आमच्या मुलांनाही तेच शिकवू.' यानंतर जेव्हा दीपिका पदुकोणला विचारण्यात आले की ती आई बनण्याचा विचार करत आहे का?

यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, "अर्थातच रणवीर आणि मला मुले खूप आवडतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचे कुटुंब सुरू करु."

सध्या दीपिकाच्या या वक्तव्याची सोशल मिडियावर खुप चर्चा आहे. दोघांचे चाहते या बातमीनंतर खुपच खुश आहेत.

दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या आगामी 'फाइटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. हा 25 जानेवारीला जगभरात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT