Dunki Rajkumar Hirani Movie Vicky Kaushal Comment on Shah rukh khan esakal
मनोरंजन

Dunki Vicky Kaushal : शाहरुखला 'बॉलीवूडचा बादशहा' का म्हणतात? विकी कौशलनं सांगितलं 'सिक्रेट'!

विकीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव हा वेगळाच होता.

युगंधर ताजणे

Dunki Rajkumar Hirani Movie Vicky Kaushal Comment on Shah rukh khan : प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा त्याच्या आगामी सॅम बहादुर नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण या सगळ्यात त्याचा किंग खान शाहरुखसोबत देखील डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दरम्यान विकीनं शाहरुख सोबत स्क्रिन शेयर करतानाचा अनुभव एका मुलाखतीतून कथन केला असून त्याची चर्चा होत आहे.

विकीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव हा वेगळाच होता. त्याच्या सोबत स्क्रिन शेयर करणं हे खूप काही शिकवून जाणारे आहे. ते एका स्वप्नासारखे होते. किंग खानला भेटणं हेच तुमच्यासाठी स्वप्न आहे. माझं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आता त्याच्यासोबत काम करणं हे देखील मोठी पोचपावती म्हणावी लागेल.

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

मला चित्रपटांविषयी आणखी जास्त सांगता येणार नाही. पण एकुण ती प्रोसेसच खूप भन्नाट होती. मी जेव्हा शाहरुखसोबत काम केले तेव्हा कळले की त्याला बॉलीवूडचा बादशहा का म्हणतात, त्याचे कारण तो बाकीच्या अभिनेत्यांपेक्षा फार वेगळा कलाकार आहे, आणि त्याच्यासारखा दुसरा कुणीही नाही. अशा शब्दांत विकीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

डंकीच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये किंग खान सोबत विकी कौशल, तापसी पन्नु आणि बोमन इराणी हे कलाकार दिसणार आहे. त्यात शाहरुखची प्रमुख भूमिका आहे. गेल्या काही दिवसांपासून डंकी वरुन वेगळ्या वादाला देखील सुरुवात झाली आहे. हा चित्रपट साऊथच्या एका चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. प्रत्यक्षात ही एका वेगळ्या विषयावर आधारलेली कलाकृती असल्याचे म्हटले जात आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून तो बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा विश्वास मेकर्सला आहे. यापूर्वी किंग खानचे यंदाच्या वर्षात दोन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले होते. पठाण आणि जवानला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटांनी मोठी कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. डंकीला प्रभासच्या सालारशी स्पर्धा करावी लागणार आहे.

विकीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा सॅम बहादूर हा बहुचर्चित चित्रपट एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरची मोठी क्रेझ दिसून येत आहे. त्यामध्ये सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची जोरदार टक्कर ही रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार याबद्दल चाहत्यांच्या मनात कुतूहल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT