dunki teaser shah rukh khan vicky kaushal tapasi taapsee pannu rajkumar hirani  SAKAL
मनोरंजन

Dunki Teaser: मी शपथ घेतो की, लंडनला जायचा विचार केला तर आजी....किंग खानच्या डंकीचा भन्नाट टीझर

शाहरुख खानच्या डंकी सिनेमाचा धम्नाल टीझर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Dunki Teaser: शाहरुख खानच्या डंकी सिनेमाचा टीझर आज रिलीज झालाय. साधारण दीड मिनिटाच्या असलेल्या या टीझरने सर्वांचं मन जिंकलंय.

शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल असे अनेक कलाकार सिनेमात पाहायला मिळत आहेत.

(dunki teaser shah rukh khan vicky kaushal tapasi taapsee pannu rajkumar hirani)

शाहरुखच्या डंकी सिनेमाचा पहिला टीझर रिलीज

शाहरुखच्या डंकी सिनेमाच्या टीझरची सुरुवात होते एका डोंगराळ भागातुन. जिथे शाहरुख काही साथीदारांसोबत डोंगराळ भागात चालताना दिसतो. त्याच्यावर कोणीतरी बंदुक रोखुन उभं आहे.

अचानक टीझर पंजाबमध्ये घेऊन जातो. जिथे शाहरुख नाचुन - गाऊन धम्माल करताना दिसतो. त्याचे मित्रही दिसतात. तापसी पन्नू, विकी कौशलची झलक सिनेमात पाहायला मिळते. या मित्रांना लंडनमध्ये जायची इच्छा असते. आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का? हे सिनेमात पाहायला मिळेल.

शाहरुखचा खास अंदाज फॅन्सना आवडला

डंकी टीझरमध्ये शाहरुख खानचा रॉकींग अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडल्याचं दिसतंय. शाहरुख खान टीझरमध्ये कॉमेडी करताना, नाचताना, गाताना दिसतोय. शाहरुख अनेक दिवसांनी अशा हलक्याफुलक्या भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.

शाहरुख डंकी मधल्या हार्डीच्या भुमिकेत पुन्हा एकदा सुपरहिटचा डंका गाजवणार यात शंका नाही. डंकीमध्ये शाहरुखसोबत विकी कौशल आणि तापसी पन्नू हे कलाकार सुद्धा प्रभावी भुमिकेत आहेत.

डंकीची रिलीज डेट काय?

टीझर आल्यापासुन शाहरुख खानच्या डंकीची उत्सुकता शिगेला आहे. डंकी सिनेमात शाहरुखशिवाय तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर विकी कौशल या चित्रपटात कॅमिओ करणार अशी चर्चा आहे.

डंकी सिनेमा २१ डिसेंबरला संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT