Dunki Vs Salaar: प्रभाससमोर बादशाह झुकला! सलारशी टक्कर टाळण्यासाठी शाहरुखने 'डंकी'ची रिलिज डेट ढकलली पुढे

salaar vs dunki shahrukh khan dunki release date postponed  to avoid box office clash with Prabhas' Salaar?
salaar vs dunki shahrukh khan dunki release date postponed to avoid box office clash with Prabhas' Salaar?Esakal

Dunki Vs Salaar: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने यंदा बॉक्स ऑफिसवर त्याचा दबदबा निर्माण केला आहे. यावर्षी शाहरुखचे दोन सिनेमे रिलिज झाले आणि दोघांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यात पहिला सिनेमा होता 'पठाण' आणि दुसरा 'जवान'.

दोन्ही सिनेमांनी हजार कोटींचा टप्पा पार केला. त्यातच जगभरात 'जवान' हा चित्रपट हजार कोटींच्यावर कमाई करणारा पहिला हिंदी सिनेमा ठरला आहे. आता शाहरुख त्याच्या आगामी सिनेमा 'डंकी'मुळे चर्चेत आहे.

salaar vs dunki shahrukh khan dunki release date postponed  to avoid box office clash with Prabhas' Salaar?
The Vaccine War: बॉक्स ऑफिसवर फेल झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर'ला ऑस्कर अकादमीकडून 'गुडन्यूज'

शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर डंकी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिसेंबर महिन्यात बरेच बहूप्रतिक्षीत सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ज्यात रणबीरचा अॅनिमल, कतरिनाचा मेरी ख्रिसमस या चित्रपटांचा देखील सामावेश आहे. मात्र यात जास्त चर्चा होत आहे ती प्रभासच्या 'सालार'ची आणि शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाची.

हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर समोरासमोर भिडणार होते. पण आता शाहरुख खानने त्याचा 'डंकी' या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.अशी चर्चा होत आहे.

salaar vs dunki shahrukh khan dunki release date postponed  to avoid box office clash with Prabhas' Salaar?
Saba Azad Video: "तुला थेरपीची गरज" म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सबानं दिलं जबराट उत्तर म्हणाली...

ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर डंकी संदर्भात ही बातमी शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'सलार आणि डंकीमध्ये संघर्ष होणार नाहीये. शाहरुख खानचा डंकी पुढे ढकलला जाणार आहे. प्रभासचा सालार हा चित्रपट एकटाच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आदिपुरुष सुपरफ्लॉप झाला असला तरी साउथ स्टार प्रभासचे चाहते त्याच्या आगामी सालार सिनेमाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे. या चित्रपटा संबधित सर्व अपडेट त्यांना जाणुन घ्यायचे असतात. यातच सालारच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीजची डेटही जाहीर केली होती.

सालार चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यानी लिहिले, सालार सीझफायर 22 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज होत आहे.

सालार चित्रपटामध्ये प्रभाससोबत श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या चित्रपटाची चाहते प्रतिक्षा करत आहे.

salaar vs dunki shahrukh khan dunki release date postponed  to avoid box office clash with Prabhas' Salaar?
Sam Bahadur Teaser: भारतीय सेना हेच माझं आयुष्य! विकीच्या सॅम बहादूर सिनेमाचा जबरदस्त टीझर

तर दुसरीकडे शाहरुखच्या डंकी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याची रिलीज डेट अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही तरी हा सिनेमा देखील 22 डिसेंबर रिलिज होणार अशी चर्चा सुरु होती.

डंकी सिनेमात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे तर विकी कौशल देखील डंकीमध्ये दिसणार आहे. डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com