Elvish Yadav stopped in Rajasthan Esakal
मनोरंजन

एल्विशला अटक का नाही केली? कोटा पोलिसांनी दिले स्पष्टिकरण!

Vaishali Patil

Elvish Yadav stopped in Rajasthan: गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव हा गेल्या चर्चेत आला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केली. एल्विशवर ड्रग्ज तस्करी आणि रेव्ह पार्ट्यांचा आरोप आहे. त्यानंतर तो फरार असल्याचे सांगितले जात होते.

आता एल्विशला शनिवारी राजस्थानच्या कोटा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, थोड्या वेळातच त्याला सोडण्यात आले. एल्विश विरोधात FIR असताना त्याला लगेच का सोडले याबाबात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता याबाबत कोटा पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोटामध्ये एल्विश यादवला ताब्यात घेतल्याबाबत डीएसपी कैलाश चंद्र म्हणाले - "राजस्थान विधानसभा निवडणुकीमुळे नाकाबंदी दरम्यान नेहमीप्रमाणे तपासणी केली जात होती. यादरम्यान एक पंजाब क्रमांकाचे वाहन आले, ज्या गाडीत तीन-चार जण होते. यावेळी तपास केला असता त्यातील एकाने त्याचे नाव एल्विश यादव असल्याचे सांगितले.

एल्विशच्या प्रकरणी नोएडामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आम्हाला होती. त्यामुळे जेव्हा आम्ही नोएडामधील संबंधित पोलिस स्टेशनच्या डीसीपी आणि एसीपीशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की एल्विश यादव हा वॉन्टेड नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला अटक केली नाही."

सध्या राजस्थान पोलिसांसोबत उभा असलेला एल्विशचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एल्विशच्या चाहत्यांनीही त्याचे फोटो शेयर करत त्याला पाठिंबा दिला आहे.

नोएडामध्ये युट्यूबर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पाच लोकांना या प्रकरणात अटक केली आहे. याप्रकरणी व्हिडिओ शेयर करत एल्विशने या आरोपांचे खंडण केले होते.

'माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे निराधार आहेत, सर्व खोटे आहेत. यात एक टक्काही तथ्य नाही. मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे.'असं त्याने व्हिडिओ शेयर करत सांगितले होते. आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Supreme Court: लाखोंच्या आस्थेला चुकीचे ठरविणे कठीण; सरन्यायाधीशांची टिप्पणी, शबरीमला प्रकरण सुनावणीवेळी धर्माला खिळखिळे न करण्याचे आवाहन!

Women Reservation: महिला आरक्षणापुरताच पाठिंबा; ‘इंडिया’ आघाडीचा निर्णय, मतदारसंघ फेररचनेला कडाडून विरोध, विरोधकांनी डागली ताेफ..

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT