
Athiya-Rahul wedding: अगोदर मैत्री त्यानंतर प्रेम आणि आता लग्न, अथिया आणि केएल राहुलची क्यूट लव्ह स्टोरी
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी 23 जानेवारी 2023 रोजी एकमेकांशी विवाहबंधनात अडकणार आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे लग्न चर्चेत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या लव्हस्टोरीचीही खूप चर्चा झाली होती. लग्नापूर्वी दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आपलं नातं गुपित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांची जवळीक कोणापासूनही लपून राहू शकली नाही.या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली ते जाणून घेऊया.
अथिया आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर, दोघे पहिल्यांदा कसे भेटले याबद्दल काहीही स्पष्ट नाही, पण जर मीडिया रिपोर्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, 2019 मध्ये अथिया आणि राहुलची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंडने केली होती. पहिल्या भेटीत दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडली, त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
जेव्हा अथिया आणि राहुलने इंस्टाग्रामवर एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपची अफवा आणखीनच वाढली.पुन्हा एकदा या दोघांचे नाते तेव्हा चर्चेत आले जेव्हा 2021 मध्ये राहुल कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला तेव्हा अथियाही त्याच्यासोबत तिथे पोहोचली. दोघांनी याबाबत काहीही सांगितले नाही, मात्र त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.
हेही वाचा: Bigg Boss 16:अर्चनाला झटके आले की काय? स्पर्धक घाबरले...व्हिडिओ व्हायरल
केएल राहुलने 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवसानिमित्त अथियासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. अथियासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना राहुलने खूप रोमँटिक कॅप्शन लिहिले होते. यानंतर राहुल अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही पोहोचला होता. जिथे राहुल आणि अथियाने कपल पोजही दिली. दोघांनी पहिल्यांदाच एका इव्हेंटमध्ये एकत्र भाग घेतला होता.
इंग्लंड कसोटी मालिका 2021 दरम्यान, दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता, जेव्हा अथियाचे वडील सुनील शेट्टी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या नात्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रश्नांवर ते केवळ मीडिया रिपोर्ट्स म्हणून फेटाळायचे. खरं तर अथिया आणि राहुलला आपलं नातं मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवायचं होतं. त्यावेळी सुनील शेट्टीने त्यांना खूप मदत केली होती.