Elvish Yadav on Maneka Gandhi:  Esakal
मनोरंजन

Elvish Yadav: मनेका गांधींविरोधात मानहानीचा दावा ठोकणार एल्विश! व्हिडिओ शेयर करत दिली धमकी

Vaishali Patil

Elvish Yadav on Maneka Gandhi: बिग बॉस ओटीटी 2 सिझनचा विजेता एल्विश यादव सतत चर्चेत आहे. त्यातच आता एल्विश गेल्या दोन दिवसांपासून जास्तच चर्चेत आला. त्त्याचे कारण ठरले त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा.

एल्विशवर एक रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये लोक सापाच्या विषाची नशा करत होते. एवढेच नाही तर त्याच्यावर सापांची तस्करी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एल्विश यादवचा सहभाग असल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी यांनी एक निवेदन जारी करून रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली.

या प्रकरणी शुक्रवारी नोएडामध्ये युट्यूबरसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. त्यानंतर एल्विशने त्याचा या प्रकरणासोबत काहीही संबध नसल्याचे सांगितले आणि सर्व चौकशीला तो पोलिसांना मदत करेल असेही सांगितले.

त्यानंतर आता एल्विशने आणखी एक विधान जारी करत राजकारणी मनेका गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याची पुष्टी केली आहे. एल्विशने यापुर्वी ट्विटमध्ये म्हटले होते की, मनेका गांधी यांनी आरोप केल्याबद्दल माफी मागावी कारण त्याचा यात सहभाग नाही.

त्यानंतर एल्विशने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांने दावा केला आहे की मेनका यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

व्हिडिओमध्ये एल्विश म्हणाला, 'माझ्यावर आरोप करण्यात आला, मेनका गांधीजींनी मला सप्लायरचे प्रमुख बनवलं. मानहानीची केस होईल भावा, मी असं सोडणार नाही. मी हलक्यात सोडणार नाही. आता मी या गोष्टींमध्ये सक्रिय झालो आहे. पूर्वी मला वाटायचं की मी माझा वेळ वाया घालवत नाही. पण प्रतिमा खराब किंवा मलिन झाल्यावर मी त्यांना सोडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT