fighter movie twitter review hrithik roshan deepika padukon anil kapoor SAKAL
मनोरंजन

Fighter Twitter Review: असा अनुभव होणे नाही! हृतिक-दीपिकाचा 'फायटर' नेटकऱ्यांना कसा वाटला?

'फायटर' पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय

Devendra Jadhav

Fighter Twitter Review News: 'फायटर' सिनेमा आज रिलीज झाला आहे. हृतिक रोशन - दीपिका पादुकोण यांच्या 'फायटर'ची उत्सुकता शिगेला आहे. 'फायटर' चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत. अनेकांना 'फायटर' सिनेमा आवडलेला दिसतोय. कशा आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया? जाणून घ्या.

'फायटर' चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यांनी हा चित्रपट कसा आहे, याबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फायटर फर्स्ट डे फर्स्ट शो ट्रेंड होत असून लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एका यूजरने लिहिले, "मी फायटर पाहिला आहे. फायटर बेस्ट, हृतिक बेस्ट, दीपिका बेस्ट, अनील बेस्ट आणि सिद्धार्थही बेस्ट. सर्वांना सलाम."

दुसर्‍या युजरने लिहिले, "फायटरचा एरियल शॉट हा केवळ एक सीन नाही. हा असा क्षण आहे जो आपल्याला श्वास रोखण्यास प्रवृत्त करतो. हृतिक रोशनचा हा एक चांगला चित्रपट आहे."

याशिवाय एका यूजरने प्रेक्षकांचे रिव्ह्यू शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. आणखी एका युजरने लिहिले, "हृतिक रोशनने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो सर्वोत्तम का आहे? भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वांगीण प्रतिभांपैकी एक म्हणजे हृतिक. आणि यावेळी हृतिक फायटर हा ग्रँड सिनेमा घेऊन आला आहे."

या देशांमध्ये 'फायटर'वर बंदी

आखाती देशांमध्ये (Gulf Countries) 'फायटर'वर बंदी आणण्यात आलीय. बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर 'फाइटर'ला UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये रिलीज करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

10 जानेवारी 2024 रोजी सेन्सॉर स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते आणि 23 जानेवारी रोजी अधिकृतपणे सांगण्यात आले की 'फायटर' जवळपास सर्व आखाती देशांमध्ये प्रदर्शित होणार नाही. आखाती देशांनी फायटर रिलीज करण्यास नकार देणे हा निर्मात्यांसाठी मोठा धक्का आहे. या बंदीमागचं कारण अद्याप कळू शकलं नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT