hera pheri 3, hera pheri SAKAL
मनोरंजन

Hera Pheri 3 : अखेर अक्षय कुमारने दिला होकार.. हेरा फेरी ३ लवकरच येणार... सर्वांना आनंद

हेरा फेरी ३ च्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे

Devendra Jadhav

Hera Pheri 3 News: बाबूभैय्या, राजू आणि श्याम यांचा हेरा फेरी कोणी पाहिला नाही असा माणूस सापडणं कठीण आहे. लहानांपासून ते अगदी वयस्क माणसांपर्यंत सर्वांना हेराफेरी प्रचंड आवडतो.

हेरा फेरी आणि हेरा फेरी २ या दोन्ही भागांचे प्रचंड चाहते आहेत. हेरा फेरीचे कॉमेडी व्हिडिओज, मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आता हेरा फेरी ३ चा मार्गही मोकळा झालाय.

हेरा फेरी 3 साठी आणि राजू, श्याम आणि बाबूराव हे मूळ त्रिकूट पुन्हा येण्याची शक्यता आहे. हेरा फेरी ३ मध्ये अक्षय कुमार नसणार हे निश्चित झालेलं.

पण अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच मुंबईत सुनील शेट्टी, परेश रावल आणि निर्माते फिरोज नाडियादवाला यांची भेट घेऊन हेरा फेरी ३ विषयी चर्चा केली.

अक्षयने गेल्या वर्षी सर्वांसमोर जाहीर केले होते की काही क्रिएटिव्ह फरकांमुळे तो हेरा फेरी ३ चा भाग नसणार आहे.

अक्षय हेरा फेरी 3 मधून बाहेर पडल्यानंतर कार्तिक आर्यन त्याची जागी असा दावा केला जात होता. पण हेरा फेरी ३ च्या फॅन्ससाठी मोठी खुशखबर आहे ती म्हणजे अक्षय कुमार हेरा फेरी ३ मध्ये येतोय.

त्यामुळे अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हेरा फेरी ३ निमित्ताने पुन्हा एकत्र बघायला बघायला मिळणार आहे

शनिवारी अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि फिरोज नाडियादवाला यांची मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये दीर्घ बैठक झाली. हेरा फेरीची मूळ टीम एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या तिघांना एकत्र पाहून एम्पायर स्टुडिओमधील संपूर्ण कर्मचारी भावूक झाले आणि त्यांनी आपला उत्साह साजरा केला. एम्पायर स्टुडिओत मूळ हेरा फेरीचे शूटिंग झाले होते.

अक्षय कमबॅक करणार यावर शिक्कामोर्तब झाला असला तरीही काही गोष्टी सकारात्मक दिसत आहेत. “सर्व काही सुरळीत झाल्यावर, हेरा फेरी ३ विषयी अधिकृत घोषणा केली जाईल.

निर्माते हेरा फेरी ३ साठी अक्षय, सुनील आणि परेश यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. सर्व काही सुरळीत झालं तर लवकरच हेरा फेरी ३ चं शूटिंग सुरु होईल आणि २०२४ ला हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT