gautami patil new song Cheez Lai Kadak song by vaishali samant SAKAL
मनोरंजन

Gautami Patil: 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका...', गौतमीला म्हणायचंय काय? नवीन गाणं बघाच

वैशाली सामंतच्या आवाजातलं गौतमी पाटीलचं नवीन गाणं बघाच

Devendra Jadhav

Gautami Patil New Song: आपल्या नृत्याने सर्वांना फिदा करणाऱ्या गौतमी पाटीलच्या प्रत्येक गाण्याची सर्वांना उत्सुकता असते. ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र आता गौतमी पाटील 'इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका... आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक' म्हणत आहे.

सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी 'चीझ लई कडक' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे.

तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही.

चीझ लई कडक या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमकं काय करते हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मात्र चीझ लई कडक हे गाणं प्रेक्षकांना वेड लावणार आणि 2023 चं आयटम साँग ऑफ द ईअर (Item Song of the Year) ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Tunnel Car Fire : मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी!

Supriya Sule : अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत काय घडलं ? सुप्रिया सुळेंनी Delimitation च्या भूमिकेबद्दल दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Update : सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा

Mira Road Fire: मीरा रोड येथील दालमिया शाळेत भीषण आग! ग्रंथालय, प्रयोगशाळा, सभागृह जळून खाक; परिसरात धुराचे लोट, VIDEO VIRAL

PF News: EPF धारकांसाठी 9 मोठे बदल! PF व्याज ते 5 लाखांपर्यंत ऑटो क्लेम नेमकं काय-काय बदललं? मंत्र्यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT