Ira Khan and Nupur Shikhare's wedding  Esakal
मनोरंजन

Ira Khan- Nupur Shikhare's wedding: भाईजानच्या घरी पार पडला आमिरच्या लेकीचा मेहंदी सोहळा!

आमिर खानची मुलगी आयरा खानच्या मेहंदीचा कार्यक्रम सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री झाला.

Vaishali Patil

Ira Khan and Nupur Shikhare's wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिरच्या घरी आनंदाचे वातावरण असून आयराच्या लग्नाच्या तयारीला वेग आला आहे.

त्यातच आता आयराच्या लग्नाच्या तयारीला भाईजान म्हणजेच सलमान खानने देखील हातभार लावला आहे. मंगळवारी रात्री सलमान खानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आमिर खानच्या लेकीसाठी खास मेहंदी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सलमान खानचे घर सजवण्यात आले होते.

तर आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद सलमान खानच्या घरी जाताना दिसले. यावेळी आमिर खानने काळ्या टी-शर्टसह बेज रंगाची पँट घातली होती तर जुनैद शर्ट पँटमध्ये दिसला. यावेळी आमिरने पापाराझींसोबत गप्पा मारल्या.

सलमान खान आणि आमिर खान हे गेल्या अनेक दशकांपासून चांगले मित्र आहेत. आता सलमान खान आमिरची मुलगी आयरा खानच्या लग्नात सहभागी झाला आणि तिच्यासाठी खास मेहंदी कार्यक्रमाचे आपल्या घरी आयोजन केल्यानं सर्वत्र सध्या सलमानची चर्चा आहे. यावेळी आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद सोबतच आझाद आणि त्याची पुर्व पत्नी रीना दत्ता, किरण राव देखील या फंक्शनमध्ये दिसल्या.

तर आयराने देखील काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते. ज्यात ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत होती. आयरानं गोल्डन ब्लाउजसह मरून साडी नेसली होती. तर नुपूर शिखरेने मरुन कुर्त्यावर गोल्डन ब्राऊन जॅकेट आणि डोक्यावर फेटा बांधला होता.

मंगळवारी दुपारी आयरा खानचा हळदी सोहळा पार पडला. यावेळी किरण राव आणि रीना दत्ता या दोन्हीच्या पारंपरिक मराठी लूकची बरीच चर्चा झाली.

आयरा आज नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा आणि नुपूर शिखरे मुंबईतील ताज लँड्स एंड येथे कोर्ट मॅरेज करणार आहेत. तर आयरा आणि नुपूर 8 जानेवारीला उदयपूरमध्ये शाही लग्न सोहळा करणार आहेत. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोहोचू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT