Pune International Film Festival 2024: ‘पिफ’च्या स्पर्धा विभागातील मराठी चित्रपटांची घोषणा!

‘पिफ’मध्ये मराठी चित्रपटांच्या स्पर्धा विभागाचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षक करतात.
Pune International Film Festival 2024:
Pune International Film Festival 2024: Esakal

Pune International Film Festival 2024 : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धा विभागातील सात चित्रपटांच्या नावांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. ‘वल्ली’, ‘स्थळ’, ‘भेरा’, ‘श्यामची आई’, ‘नाळ - भाग २’, ‘छबिला’ आणि ‘जिप्सी’ या सात चित्रपटांचा यंदा समावेश आहे.

‘पिफ’मध्ये मराठी चित्रपटांच्या स्पर्धा विभागाचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षक करतात. या विभागातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटास पाच लाख रुपयांचा राज्य सरकारचा ‘संत तुकाराम’ पुरस्कार दिला जातो.

तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट पटकथा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार’, असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान केले जातात.

Pune International Film Festival 2024:
Ira Khan Wedding : आज आमिरच्या लेकीचं लग्न! Pre Wedding चे फोटो शेयर करत केला होणाऱ्या नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव

‘पिफ’ १८ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. महोत्सवासाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. ५) सुरू होणार आहे. www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर रसिकांना नोंदणी करता येईल.

Pune International Film Festival 2024:
Orry-Palak Tiwari : ओरीचा अश्लील मेसेज, तरीही पलकची माफी! नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी निवडले जाणारे मराठी चित्रपट राज्यातील विविध भागांतील युवकांनी तयार केलेले असतात. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात, असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या वर्षीसुद्धा ही परंपरा कायम राहील.

- डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक व महोत्सवाचे संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com