Ira Khan Wedding Esakal
मनोरंजन

Ira Khan Wedding: लग्न आमिरच्या लेकीचं मात्र चर्चा किरण रावची! व्हिडिओ व्हायरल

3 जानेवारी 2024 रोजी आयरानं नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली.

Vaishali Patil

Ira Khan Wedding, Aamir Khan: बऱ्याच दिवसांपासून आमिर खानची मुलगी आयरा खान ही तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. आयरा आणि नुपूरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी झाली होती. आता अखेर 3 जानेवारी 2024 रोजी आयरानं नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांशिवाय बॉलिवूड कलाकार आणि अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सध्या आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर केवळ वधू वराचाच नाही तर आमिर खानचा देखील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आमिरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आयरा आणि नुपूरच्या लग्नानंतर सर्व फॅमिलीने एकत्र येत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या होत्या. यावेळी आमिर खान त्याच्या दोन्ही पुर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण रावही उपस्थित होत्या.

यावेळी त्याच्या दोन्ही पत्नी पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. तर आमिर लेकिच्या लग्नात शेरवानी आणि फेटा बांधलेला दिसला. तर या व्हायरल व्हिडिओमध्ये आमिर खानचे संपूर्ण कुटुंब नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढत असताना यादरम्यान आमिरही पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

यावेळी आमिरने किरणला किस केले आणि प्रेमाचा वर्षाव केला. त्यामुळे लेकीच्या लग्नात आमिरच भाव खाऊन गेला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयरा आणि नुपूरच्या लग्नापेक्षा आमिर खानचीच जास्त चर्चा होत आहे. या व्हिडिओवर आता यूजर्स प्रतिक्रिया देत ​​आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आयरा खान आणि नुपूर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एंगेजमेंट केली होती. नुपूर हा आमिर खानचा ट्रेनर आहे. जेव्हा आयरा डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा नुपूरने तिला त्यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता दोघांनी लग्नगाठ बांधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

Latest Marathi News Live Update : बुलडाण्यात सर्क्युलर रोडवर धावत्या बसला आग! युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

यू-ट्युब पाहून मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, नागपूरमधील धक्कादायक घटना; १८ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT