Ishaan Khatter reveals he got school admission esakal
मनोरंजन

Big B Amitabh Bachchan : अमिताभ यांच्यामुळे शाळेत मिळाला प्रवेश! प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितली आठवण

ईशाननं सांगितलं की, त्याची आणि बिग बी यांची भेट पहिल्यांदा सुर्यवंशमच्या सेटवर झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Ishaan Khatter reveals he got school admission : बॉलीवूडमधील नवोदित अभिनेते आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यातील संवाद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर अमिताभ हे वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे दिसून आले आहे. वयाच्या ८० व्या वर्षात देखील अमिताभ बच्चन यांचा उत्साह हा नव्या कलाकारांना थक्क करणारा आहे.

बिग बी पुन्हा चर्चेत आले याचे कारण प्रसिद्ध अभिनेता ईशान खट्टर हा आहे. त्यानं बिग बी यांच्यामुळे आपल्याला किती मोठी मदत झाली याविषयी खुलासा केला आहे. धडक या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या ईशानची आणि जान्हवी कपूरच्या रिलेशनशिपची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र त्यांच्यात ब्रेक अप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ईशाननं सांगितलं की, त्याची आणि बिग बी यांची भेट पहिल्यांदा सुर्यवंशमच्या सेटवर झाली होती. त्यामध्ये ईशाननं बाल कलाकाराची भूमिका केली होती. त्याचं कौतूकही झालं होतं. त्याचे वडील राजेश खट्टर आणि आई निलीमा अजीम यांनी देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. एका मुलाखतीमध्ये ईशाननं त्याच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ईशाननं सांगितलं की, मला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा अशी आईची खूप इच्छा होती. मात्र तसे होत नव्हते. बिग बी यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं शाळा प्रशासनाशी बातचीत केली होती. आणि मला शाळेत प्रवेश मिळाला होता. या गोष्टीचा मला खूप आनंद आणि अभिमानही आहे. त्या शाळेमध्ये मला केवळ बिग बी यांच्यामुळेच प्रवेश मिळाला.

अभिनेत्यानं ही गोष्ट काही स्वत: सांगितली नव्हती. त्याची आई निलिमा यांनी या आठवणींविषयी सांगितले होते. त्यांनी ईशानला त्याबद्दल सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्यानं काही मुलाखतींमध्ये त्याबाबत सविस्तर माहिती दिली होती. ईशानच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो आगामी काळात काही वेगवेगळ्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT