Viral Video esakal
मनोरंजन

Viral Video: 'आता कसं वाटतंय'? पोलिसांनीच नाठाळांच्या कानात वाजवले 'भोंगे'!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं अनेक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं अनेक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं शहरात आलेल्या भाविकांना पुंगी वाजवून त्रास देणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. तो व्हिडिओ आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. ही घटना जबलपुरमधील आहे. लोकांनी त्यादिवशी शहरातील नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचवेळी एका टोळीनं अनेकांना पुंगी वाजवून मनस्ताप दिला होता. पोलिसांनी आता त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

साध्या वेषातील पोलिसांनी त्या नाठाळ पोरांना बरोबर हेरले आणि रस्त्यावर उठाबशा काढायला लावल्या. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आपल्याकडे देखील गणपती, आणि नवरात्रीच्या वेळी हातात मोठमोठे भोंगे घेऊन ते वाजविणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशांना नागरिक कधी समजुतीच्या सुरात तर कधी रागात समज देतात. जे ऐकत आहेत त्यांना पोलीस वठणीवर आणल्याशिवाय राहत नाही.

पोलिसांनी जबलपुरमधील त्या तरुणांना चांगलीच तंबी दिली आहे. पोलिसांनी त्या कारवाईचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर शेयर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट देखील केल्या आहेत. कर्णकर्कश आवाजातील ते भोंगे डोकेदुखीस कारणीभूत ठरतात. सातत्यानं ते वाजवून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी त्या तरुणांना पोलिसांनी अनोखी शिक्षा दिली आहे. त्यांच्याच कानात ते भोंगे वाजवून आता कसं वाटतं? अशा सुरात समजूत घातली आहे. जी नेटकऱ्यांना भावली आहे.

पोलिसांच्या अशा अभिनव प्रयोगाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. त्या तरुणांच्या असा वागण्याचा झालेल्या त्रासानं अनेकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याचा परिणाम म्हणून पोलिसांनी त्या नाठाळांना वठणीवर आणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

SCROLL FOR NEXT