Katrina-Ranbir: रणबीर कतरिनाकडे पाहतच राहिला, 'नजर झुकीच नही!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina - Ranbir

Katrina-Ranbir: रणबीर कतरिनाकडे पाहतच राहिला, 'नजर झुकीच नही!'

Ranbir Kapoor - Katrina Kaif: एकेकाळचे एक्स कपल म्हणून रणबीर आणि कतरिनाविषयी बऱ्याच जणांना माहिती आहे. गोष्ट लग्नापर्यत जाऊन पोहचली होती. मात्र पुढे काय बिनसलं माहिती नाही. रणबीर थेट आलियाच्या प्रेमात पडला. कतरिनानं देखील विकी कौशलचा हात धरला. पुढे अनेक दिवस त्यांच्यातील ब्रेक अपची चर्चा होती. आता दोघांची लग्न झाली. ते आपआपल्या संसारात व्यस्त आहे. अशातच नवरात्रीच्या निमित्तानं एका कार्यक्रमामध्ये त्यांची नजरानजर झाली. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

रणबीर आणि कतरिनाची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. लग्नानंतर रणबीर आणि कतरिना यांच्यातील संवाद तसा कमी झाला. कतरिनाच्या लग्नात रणबीर नव्हता तसा रणबीरच्या लग्नातही कतरिना न दिसल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोनं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलिया - रणबीरनं काही दिवसांपूर्वी गोड बातमी दिली होती.

रणबीर आणि कतरिना हे नवरात्रीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले होते. यावेळी रणबीरनं कतरिनाकडे जो नेत्रकटाक्ष टाकला तो कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रया भलत्याच भन्नाट आहेत. एकानं तर नजर काही हटलीच नाही. असे म्हणून रणबीरला कोपरखळी मारली आहे. दुसऱ्यानं जुन्या प्रेमाच्या आठवणी ताज्या असे म्हटले आहे.

हेही वाचा: PS 1 Review: पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण निव्वळ 'रटाळवाणा'

एका ज्वेलर्सच्या ब्रँडिंगसाठी हे दोघे सेलिब्रेटी एकत्र आले होते. त्यावेळी टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन, आर माधवन, प्रभु गणेशन हे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. मात्र चर्चा रंगली ती रणबीर आणि कतरिनाची...

हेही वाचा: Trisha Krishnan: स्वप्नात येणारी 'त्रिशा'!