Haesoo Death Esakal
मनोरंजन

Haesoo Death: K-pop इंडस्ट्री पुन्हा हादरली.. आणखी एका प्रसिद्ध के पॉप सिंगरने 29 व्या वर्षी केली आत्महत्या

Vaishali Patil

भारतात कोरियन संगीत प्रेमींची काही कमी नाही. भारतातही के पॉप ब्रण्ड हा खुपच प्रसिद्ध आहे. मात्र के पॉप प्रेमींसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीआहे.

प्रसिद्ध के-पॉप गायक हासूने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या केवळ 29 वर्षी तिनं हे टोकाचं पाउल उचललं आहे. अनेक कोरियन न्यूजनुसार, ती तिच्या हॉटेल रुममध्ये मृतावस्थेत आढळली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे. हेसूच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

जेओला बुक-डोच्या वांजू गनमधील ग्वांगजुम्यॉन पीपल्स डे कार्यक्रमासाठी ती 20 मे 2023 रोजी वांजू गन, जिओलाबुक-डो येथे ग्वांगजुमियोन पीपल्स डे कार्यक्रमात सादर करणार होती. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचा फोन आयोजकांना आला. हसूच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

तिचा जन्म 1993 मध्ये झाला. तिने 2019 मध्ये माय लाइफ, मी ती या सोलो अल्बमने आपल्या करिअरची सुरुवात केली. गायो स्टेज, हँगआउट विथ यू आणि द ट्रॉट शोमध्ये परफॉर्म करून ती लोकप्रिय झाली.

13 मे रोजी गायिका तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. गायकाच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. हाय सू तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती.

तर हसूच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते हादरले असून सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विट करून रेस्ट-इन-पीस लिहिले आहे. सोशल मिडियावर तिची चर्चा आहे.

एप्रिल रोजी अॅस्ट्रो स्टार मून बिनने देखील अशाच प्रकारे आत्महत्या केली होती. त्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. मून बिन यांचे वयाच्या 25 व्या वर्षी हे टोकाचं पाउल उचललं होतं.

मून बिनच्या आकस्मिक मृत्यूनंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर, आता के-पॉप गायक हसूने देखील त्याचप्रकारे आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणीही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागला नाही शोध

SCROLL FOR NEXT