Kangana Ranaut Bollywood Actress Brother Akshat esakal
मनोरंजन

Kangana Ranaut : कंगना आत्या झाली! भाच्याचं नाव काय ठेवलं माहितीये?

कंगनानं सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Bollywood Actress Brother Akshat : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. कंगनाचा एकही दिवस असा जात नाही की ज्यामुळे ती चर्चेत येत नाही. सतत सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यानं कंगना नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

कंगनानं सोशल मीडियावर जी पोस्ट केली आहे त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतुक केलं आहे. कंगना आत्या झाली आहे. तिच्या भावाला मुलगा झाला असून त्याच्यासोबतचा फोटो कंगनानं शेयर केला आहे. कंगनानं देखील घरी त्या लहान पाहुण्याचं स्वागत केले आहे. त्याचं नाव जे ठेवलं आहे त्याचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कंगनाचा भाऊ अक्षतनं ही गुड न्यूज दिली असून सेलिब्रेटी कंगनानं बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनानं खास पोस्ट शेयर करताना म्हटले आहे की, आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. आमच्या परिवारात एका लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. अक्षत रनौत आणि त्याची पत्नी ऋतू यांना मुलगा झाला आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.

पुढे कंगना म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, या बाळाचं नाव आम्ही अश्वत्थामा असे ठेवले आहे. तुम्ही सगळ्यांनी या बाळाला आशीर्वाद द्या. आम्ही आमचा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करु इच्छितो. आम्ही सदैव आपले आभारी आहोत...इति, रनौत कुटूंबीय...अशी पोस्ट कंगनानं शेयर केली असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिसादही दिला आहे.

कंगनानं ती पोस्ट केल्यानंतर काहींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी त्या पोस्टवर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कंगनाला नेटकऱ्यांनी विचारलं आहे की, तू ज्याला कृष्णाकडून शाप मिळाला आहे असे नाव का ठेवले आहेस, अश्वत्थामा असेच नाव का, अशा शब्दांत तिला प्रश्न विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

SCROLL FOR NEXT