kangana ranaut Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut On Jawan: कंगनाही झाली 'जवान'च्या प्रेमात वेडी! लाबंलचक पोस्ट शेयर करत गायलं शाहरुखचं गुणगाण!

Vaishali Patil

Kangana Ranaut Praised Jawan: काल मनोरंजन विश्वात सर्वत्र फक्त शाहरुख खानच्या जवानची चर्चा होती. या चित्रपटाच टिझर आणि गाणी रिलिज झाल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खुपच उत्सूक होते. काल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला आणि शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं. हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी आहे.

त्यातच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून आलेल्या चाहत्यांनी या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यातच अनेक कलाकरांनीही देखील जवान पाहिल्यानंतर सोशल मीडियावर शाहरुख खानचं आणि जवानचं कौतुक करत आहेत. नेहमी शाहरुखवर आणि बॉलिवूडवर टीका करणाऱ्यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

बॉलिवूडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच बॉलिवूडवर टीका करत असते. बॉलिवूड कलाकारांना देखील ती टोमणे मारत असते. मात्र फार क्वचित वेळा ती कुण्या स्टारचं कौतुक करते. तिने शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. इतकच नाही तर कंगनाने शाहरुख खानला सिनेमाचा देव म्हटले आहे.

कंगनाने 'जवान' रिलीजच्या पहिल्या दिवशी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यात तिने जवान सिनेमाचं पोस्टर शेयर करत शाहरुख खान आणि त्याच्या टिमला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर चित्रपटाच्या टिमचंही कौतुक केलं. या स्टोरीत कंगना लिहिते की,

‘नव्वदच्या दशकातील अल्टिमेट अत्यंत प्रेमळ मुलगा बनला मग बराच काळ संघर्ष केला. वयाच्या 40 व्या वर्षापासून ते 50 च्या दशकाच्या मध्यापर्यंत, त्याने आपल्या प्रेक्षकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आता वयाच्या 60 व्या वर्षी तो सर्वोत्कृष्ट मास सुपरहिरो म्हणून पुन्हा परत आला. खऱ्या आयुष्यातील सुपर हिरो.

मला तो काळ आठवतो जेव्हा लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला चित्रपटात का घेतलं म्हणत त्याची खिल्ली उडवली, परंतु त्याचा संघर्ष सर्व कलाकारांसाठी एक मास्टर क्लास आहे जे दीर्घ कारकीर्दीचा आनंद घेत आहेत परंतु प्रेक्षकांशी पुन्हा कनेक्ट होण्याची आवश्यकता आहे. कनेक्शन स्थापित करणे आवश्यक आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिते की, 'शाहरुख खान हा सिनेमाचा देव आहे ज्याची भारताला खुप गरज आहे. पण, केवळ मिठी किंवा डिंपल्ससाठीच नाही तर जगाला वाचवण्याचीही गरज आहे. किंग खान, तुझ्या समर्पणाला, मेहनतीला आणि नम्रतेला सलाम.'

कंगनाने या पोस्टमध्ये शाहरुखचे खुपच कौतुक केले आहे. त्यामुळे तिच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट अखेर 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलिज झाला आणि त्याने ओपनिंग डे ला सर्व रेकॉर्ड मोडले. चित्रपटाच्या कमाई बद्दल बोलायचं झाल्यास SRK-स्टार जवानने भारतात तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT