Kangana Ranaut, Golden Temple  file photo
मनोरंजन

कंगनाची कुटुंबासोबत सुवर्ण मंदिराला भेट

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर कंगना तिचे मत नेहमी मांडत असते. कंगनाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर कंगना काही दिवस तिच्या कुटुंबीयांसोबत मनालीमध्ये राहत होती. आता नुकतीच तिने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरला भेट दिली. सुवर्ण मंदिरमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Kangana Ranaut visits Golden Temple for the first time with family Says Speechless and stunned)

कंगनाने आई आणि बहिण रंगोलीसोबत सुवर्ण मंदिराला भेट दिली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या सुवर्ण मंदिराच्या फोटोमध्ये कंगना पूजा करताना दिसत आहे. फोटो शेअर करून कंगनाने त्याला कॅप्शन दिले, 'आज मी हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिराला भेट दिली. जरी माझे बालपण उत्तरेत गेले असले तरी माझ्या परिवारातील फक्त मीच या मंदिराला पहिल्यांदा भेट देतेय. कुटुंबामधील बाकी सर्व सदस्यांनी अनेक वेळा या मंदिराला भेट दिली होती. सुवर्ण मंदिराच्या सुंदरतेबद्दल आणि दिव्यतेबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. हे मंदिर पाहून मी अचंबित झाले.'

लवकरच कंगनाचा 'थलाइवी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तसेच कंगनाचे ‘धाकड़’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट देखील लकरच प्रदर्शित होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT