kapil sharma visit aamir khan home for party  SAKAL
मनोरंजन

Kapil Sharma with Aamir Khan: आमीरच्या घरी सजली मैफिल, कपिल शर्माच्या गाण्याने रंगला माहोल, व्हिडीओ व्हायरल

कपिल शर्माने गुलाम अलींच्या गाण्याने संध्याकाळ आणखी सुंदर केली.

Devendra Jadhav

Kapil Sharma with Aamir Khan at Home News: आमिर खानने काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा मला शो मध्ये बोलवत नाही म्हणून तक्रार केली होती. आता मात्र आमिर खान आणि कपिल शर्मा यांची भेट झालीय.

आमिर खानने द कपिल शर्मा शोच्या टीमसह काही लोकांना आपल्या घरी बोलावले होते.

या भेटीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये हे सर्व कलाकार एका खोलीत बसलेले दिसत आहे.

लोकांच्या गर्दीत आमिर खान एका बाजूला बसलेला दिसतोय तर कपिल शर्मा समोरच्या सोफ्यावर बसलेला दिसतोय. कपिल शर्माने गुलाम अलींच्या गाण्याने संध्याकाळ आणखी सुंदर केली.

(kapil sharma visit aamir khan home for party)

आमिर खानने 'कॅरी ऑन जट्टा 3'च्या कलाकारांना आणि 'द कपिल शर्मा शो'च्या टीमला त्याच्या मुंबईतील निवासस्थानी आमंत्रित केले होते. आता या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आमीर खान, कपिल शर्मा, सोनम बाजवा, कविता कौशिक आणि किकू शारदा यांचा समावेश आहे. याशिवाय मागे अर्चना पूरण सिंहचा आवाजही ऐकू येत आहे.

या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा गुलाम अली यांचे प्रसिद्ध गाणे 'हंगामा है क्यूं बरपा' गाताना दिसत आहे आणि आमिर खान ऐकण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहता, असे दिसते की कपिल शर्माने आपल्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि आमिर खान टाळ्या वाजवून संपूर्ण कार्यक्रमाचा मजा लुटतोय.

या व्हिडिओवर कपिल शर्मानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, 'किती छान संध्याकाळ होती, या सुंदर आठवणी टिपल्याबद्दल धन्यवाद.'

कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी देखील आमिर खानसोबत दिसत आहेत.

हे फोटो शेअर करत कपिलने लिहिले की, 'अद्भुत संध्याकाळ आणि अप्रतिम आदरातिथ्य, प्रेम, हशा, संगीत किती सुंदर भेट आहे यासाठी धन्यवाद.

धन्यवाद आमिर खान भाई, तुम्ही आमचा अभिमान आहात. आता लवकरच आमीर खान कपिल शर्मा शो मध्ये दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT