kareena
kareena 
मनोरंजन

तैमुरला झाला भाऊ, करीनाने दिला गोंडस बाळाला जन्म

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. करीनाला मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑगस्ट २०२० मध्ये करीना गरोदर असल्याची आनंदाची बातमी सैफ अली खानने सोशल मीडियावर दिली होती. सैफ व करीनाला चार वर्षांचा मुलगा तैमुरसुद्धा आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा करीनाला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप करीना किंवा सैफकडून याची अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावरून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून करीनाच्या डिलिव्हरीच्या चर्चांना उधाण आलं होतं. करीनाच्या वडिलांनी एका मुलाखतीत तिची ड्यु डेट १५ फेब्रुवारी सांगितली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर करीनाच्या बाळंतपणाची जोरदार चर्चा होती. करीना व तैमुरचा एका लहान बाळासोबत फोटोसुद्धा व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो एक वर्ष जुना असून करीनाच्या मैत्रिणीच्या बाळासोबतचा असल्याचं स्पष्ट झालं.

सैफ व करीनाने २०१२ मध्ये लग्न केलं. 'टशन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. २० डिसेंबर २०१६ रोजी तैमुरचा जन्म झाला. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ व करीना नवीन घरात शिफ्ट झाले. गरोदरपणादरम्यान करीना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती. याशिवाय गरोदरपणातील योगसाधनेचं महत्त्वसुद्धा ती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पटवून देत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT