Kareena Kapoor khan throwback pic in burkha surface,viral on social media. Instagram
मनोरंजन

22 वर्षांपूर्वीचं करिनाचं 'बुरखा प्रेम' समोर; सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

करिना कपूर नेहमीच चर्चेत पहायला मिळते. पण सध्या तिच्या 22 वर्षापूर्वीच्या जुन्या फोटोनं तिच्याविषयीची जुनी माहिती समोर आणल्यानं जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Kareena Kapoor Burkha Photo: सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे जुने फोटो आणि व्हिडीओ अगदी कुठूनही धुंडाळून काढत व्हायरल केले जातात. बऱ्याचदा चाहत्यांना या अशा सगळ्या गोष्टी खोदून काढायला आवडतात ते आपल्या लाडक्या कलाकारांविषयी. नुकतेच करिनाचे काही जुने फोटो ज्यात तिनं बुरखा घातलेला, ते फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.(Kareena Kapoor khan throwback pic in burkha surface,viral on social media.)

चला आता करिनानं(Kareena Kapoor) कोणत्या सिनेमात बुरखा घातलेला असा विचार करताना तुम्ही देखील डोकं खाजवायला लागला असाल ना. तर बुरख्यामधील करिनाचा तो व्हायरल झालेला फोटो आहे तिच्या 'रेफ्युजी' या पदार्पणातील सिनेमाचा. म्हणजे जवळ-जवळ २२ वर्षांपूर्वीचा. करिनाच्या एका फॅन पेजवर कुणा एका चाहत्यानं 'रेफ्युजी' मध्ये नाझनीन बनलेल्या करिनाचा तो फोटो पोस्ट केला आहे.

करिनाच्या सध्याच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर करिना नुकतीच आपल्याला आमिर सोबत त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात दिसली होती. लाल सिंग चड्ढा वादात सापडल्यानं अर्थातच करिना देखील यादरम्यान काही वक्तव्यांमुळे वादात आली होती. सिनेमाला बॉयकॉट केल्यानं बॉक्सऑफिसवर करिनाचा 'लाल सिंग चड्डा' सपशेल झोपल्यात जमा आहे आता. या सिनेमात आमिर खान,करिना कपूर खान सोबतच मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदनचे असून सिनेमाची कथा अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे.

आमिर-करिनाच्या लाल सिंग चड्ढाला बॉक्सऑफिसवर टक्कर द्यायला अक्षयचा रक्षाबंधनही रिलीज झाला होता. पण दोन्ही सिनेमांना बॉयकॉट केल्यानं बॉक्सऑफिसवर नुकसान सहन करावं लागलं. आणि दोन्ही सिनेमांकडून असलेली अपेक्षा फोल ठरलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT