kareena kapoor  
मनोरंजन

जेहच्या नावावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना करीनाचं सडेतोड उत्तर

बॉलीवूडमध्ये bollywood करीना कपूरच्या kareena kapoor नावाला मोठं वलय आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood करीना कपूरच्या kareena kapoor नावाला मोठं वलय आहे. ते काही सैफ अली खानसोबत saif ali khan लग्न केलं म्हणून नाही तर तिनं ते आपल्या अभिनयानं तयार केलं आहे. सध्याच्या घडीला करीना बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. करीनाच्या भोवती हा नेहमी चिकटलेला दिसून आला आहे. जेव्हा तिनं सैफशी लग्न केलं तेव्हाही ती ट्रोल झाली. तिच्या पहिल्या मुलाचं नाव तैमुर असं ठेवलं तेव्हा तर गजब झाला होता. सैफ आणि तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता पुन्हा करीना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ते तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून.

यापूर्वी करीनाच्या kareena kapoor समर्थनार्थ बॉलीवूड़च्या आणखी एका अभिनेत्रीनं ट्रोलर्सला सुनावले होते. ती अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर swara bhaskar. आपल्या पाल्याचं नाव काय ठेवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या शब्दांत तिनं ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. करीनाचं नुकतचं प्रेग्नंसी बायबल नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यात करीनाच्या दुसऱ्या मुलाचेही फोटो असल्याची चर्चा आहे. तर त्याचे नाव जहांगीर असं ठेवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यावरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून करीना जेह वरुन ट्रोल होताना दिसत आहे. करीना आपल्या बाळाचं नाव जहांगीर ठेवणार असल्याचेही बोलले जात आहे. आणि जेह हे त्याचे टोपण नाव आहे. करीनाच्या पहिल्या मुलाच्या नावावरुनही तिला ट्रोल करण्यात आल्याचे बोलले जात होते. करिनानं इंडिया टूडेला एक मुलाखत दिली आहे. त्यात तिनं आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे

करीनानं म्हटलं आहे की, मी एक सकारात्मक विचार करणारी व्यक्ती आहे. माझ्याकडे नकारात्मक विचारांना जागा नाही. हे पाहा आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं थैमान घातलं होतं. आता आपण त्यातून मार्ग काढत आहोत. त्या दिवसांनी आपल्याला खूप काही शिकवले आहे. त्यामुळे मला असे वाटते आपण प्रत्येकानं पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे. जगात गेल्या काही दिवसांत किती मोठ्या प्रमाणात बदल घडले आहेत हे आपल्याला काही वेगळं सांगण्याच गरज नाही.

मला कोणी काहीही बोललं तरी मी त्याचा फार विचार करत नाही. मी सध्या ध्यानधारणा करते. त्याच्यामुळे माझ्या स्वभावावर बराचसा सकारात्मक परिणाम झाला आहे. आम्हाला आता दोन मुलं आहेत. त्यांच्या भविष्यावर फोकस करायचा आहे. करीनाच्या पहिल्या मुलाच्या म्हणजे तैमुरच्या नावावरुनही वाद झाला होता. एका तुर्कीश सम्राटाचं नाव ठेवल्यामुळे करीना आणि सैफ अली खानला ट्रोल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Utsav 2025 : अयोध्येत दीपोत्सव! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन; राजनाथ सिंह आणि योगींच्या हस्ते महापूजा

Nomination Rejection News : भावी नगरसेवकांसाठी आजचा गेमचेंजींग दिवस, महापालिका निवडणुकीसाठी छाननी होणार, कोणाचे अर्ज होणार अवैध

Latest Marathi News Update : पुण्यात थंडीसोबत धुकेही वाढले, तीन विमानांची उड्डाणे रद्द

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT