Video: बादशाहचं सहदेव दिर्दोसोबत 'बचपन का प्यार'

Video: बादशाहचं सहदेव दिर्दोसोबत 'बचपन का प्यार'

सोशल मीडियाच्या social media प्रभावामुळे समाजाच्या तळागाळातील नवोदितांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमाचा प्रभाव आणि परिणाम एवढा मोठा आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात अवघ्या काही मिनिटांत प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन येते. सध्या सहदेव दिर्दो sahadev dirdo नावाच्या लहान मुलाचं एक गाणं सोशल मीडियावर कमालीचं लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे. तो लाईमलाईटमध्ये आला आहे. त्याची दखल देशभरातील माध्यमांनीही घेतली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहालाही badshah त्याच्या गाण्याची भुरळ पडली. आणि आता त्याच्यासमवेतच ते गाणं प्रदर्शित केलं आहे.

बचपन का प्यार bachapan ka pyar पासून सहदेव सगळ्यांच्या चर्चेत आला. त्यानं प्रेक्षकांची पसंतीही मिळवली. आता त्यानं आपलं ऑफिशियली पहिलं गाणं रिलीज केलं आहे. त्या गाण्याला प्रख्यात रॅपर बादशाहनं तयार केलं आहे. ते गाणं सोशल मीडियावर रिलीजही करण्यात आलं आहे. त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. त्या गाण्याचं नावही बचपन का प्यार असचं आहे. त्या गाण्याच्या माध्यमातून सहदेवनं आपल्या लहानपणापासून ते मोठं होण्यापर्यतची लव स्टोरी मांडली आहे. या गाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होती अखेर ते गाणं प्रदर्शित झालं आहे.

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात सहदेव बरोबर बादशाहनं देखील परफॉर्म केलं आहे. त्या गाण्याला रिलीज होऊन काही तासच झाले आहेत. मात्र त्याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. सध्या ते गाणं युट्युबचं ट्रेडिंगचं गाणं आहे. बादशाहबरोबर त्यात आस्था गिल आणि रिकोनंही सादरीकरण केलं आहे. त्या गाण्याचे बोल बादशाहनं लिहिले आहेत. बादशाहनं आपल्या युट्युबवरुन ते गाणं रिलिज केलं आहे.

Video: बादशाहचं सहदेव दिर्दोसोबत 'बचपन का प्यार'
कधीही अन् कुठेही होऊ शकतो करोना, केंद्राचा इशारा
Video: बादशाहचं सहदेव दिर्दोसोबत 'बचपन का प्यार'
सकाळ एज्यु एक्स्पो 2021 : आजचा व्याख्यानाचा विषय, वक्ते जाणून घ्या

सुरुवातीला जेव्हा सहदेवचं हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. एका मुलाखतीत सहदेवने सांगितलं की त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरी टीव्ही, मोबाईल नसल्याचं त्याने सांगितलं. मोठं झाल्यावर गायक होण्याची इच्छा सहदेवने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com