मनोरंजन

21 वर्षे, 1 हजार एपिसोड KBC च्या आठवणीनं 'महानायक' गहिरवले

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळवली त्या कौन बनेगा करोडपतीच्या खास आठवणी आता व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळवली त्या कौन बनेगा करोडपतीच्या खास आठवणी आता व्हायरल झाल्या आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या शो नं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मनोरंजनच नाही तर त्याबरोबर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींबाबत अपडेट ठेवण्यास मदतही केली आहे. बॉलीवूडचे महानायक यांनी सुरुवातीपासून या शो चे सुत्रसंचालन केले. काही काळ किंग खान शाहरुखनंही तो प्रयत्न करुन पाहिला. मात्र बिग बींची सर त्याला काही आली नाही. आणि लोकप्रियताही मिळाली नाही. अमिताभ यांनी एका वेगळ्या उंचीवर हा शो नेला. अजूनही त्याचा टीआरपी इतर मालिकांपेक्षा सर्वाधिक आहे.

केबीसीचा 13 वा सीझन लोकप्रिय झाला आहे. अमिताभ यांनी आपल्या आतापर्यतच्या अनुभव, संवादकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचा पसंतीक्रमही टिकवून ठेवला आहे. सध्या सोशल मीडियावर केबीसीची 21 वर्षे, 1 हजार एपिसोड आणि महानायक अशा आशयाच्या काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. एवढा मोठा प्रवास अमिताभ यांनी या मालिकेच्या निमित्तानं केला आहे. प्रेक्षकांनी देखील त्यांना या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहे. जेव्हा या शो चे एक हजार एपिसोड पूर्ण झाले तेव्हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा या शो मध्ये आल्या. त्यांनी यावेळी शो मध्ये सहभागी होत बिग बींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरं दिलं.

सध्या सोशल मीडियावर कौन बनेगा करोडपतीचा हा स्पेशल शो व्हायरल झाला आहे. यावेळी केबीसीचे तब्बल एक हजार एपिसोड पूर्ण करणाऱे अमिताभ कमालीचे भावूक झाले होते. त्यांना आपला भावना व्यक्त करताना अश्रुंचा आधार घ्यावा लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये श्वेता अमिताभ यांना म्हणते की, बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आज तुमच्या या शो चा एक हजारावा एपिसोड़ आहे. तुम्हाला काय वाटते. त्यावर अमिताभ म्हणतात...असं वाटतं की पूर्ण विश्वच बदलून गेले आहे. सोनी वाहिनीच्यावतीनं त्या व्हिडिओला शेयर करण्यात आहे. त्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, चेहऱ्यावरील हसु, डोळ्यात आनंदाश्रु आणि खूप काही घेऊन आपल्या समोर येणार आहे केबीसीचा 1 हजारावा एपिसोड. केबीसीचा आतापर्यतचा प्रवास यानिमित्तानं जाणून घ्या.

केबीसीच्या पहिल्या एपिसोडचे प्रदर्शन 3 जुलै 2000 रोजी झाले होते. त्यावेळी हर्षवर्धन नवाथे नावाच्या तरुणानं पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता. आतापर्यत वेगवेगळ्या आठवणींचा गोफ या शो च्या माध्यमातून तयार झाला आहे. त्या आठवणींना उजाळा येत्या एपिसोडमधून दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

Nepal Flood Viral Video : नेपाळमधील महापुरात देवदूत बनून आली म्हैस, तरुणाचा वाचवला जीव; हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून नेटकरीही भावूक

SCROLL FOR NEXT