Nikhita Gandhi Kerala Concert: Esakal
मनोरंजन

Kerala Concert: 'माझ्याकडे शब्दच नाही...' चेंगराचेंगरी दुर्घटनेमुळे गायिका निकिता गांधीला जबर धक्का!

केरळच्या कोचीन विद्यापीठात झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थी ठार झाले, तर किमान 60 जण जखमी झाले.

Vaishali Patil

Nikhita Gandhi Kerala Concert: केरळच्या कोचीन विद्यापीठात एका संगीत महोत्सवात चेंगराचेंगरी झाली. ज्यात चार विद्यार्थी ठार झाले आहेत तर किमान 60 जण जखमी झाले. टेक-फेस्ट दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि सर्व विद्यार्थी पायऱ्यांवरून खाली पडले.

केरळमधील कोची येथील कोचीन विद्यापीठाच्या वार्षिक कार्यक्रमात निकिता परफॉर्म करणार होती, मात्र त्यापुर्वीच कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

चार जणांच्या निधनाने गायिका निकिता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. निकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे शब्द नसल्याचे सांगितले आहे.

निकिता गांधीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर शेयर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं की, "आज संध्याकाळी कोचीमध्ये जे घडले त्यामुळे मी दु:खी आणि हादरले आहे.

मी परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर जाण्यापूर्वीच अशी दुर्दैवी घटना घडली. खूप दुःख झाले आहे. दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना."

निकिता गांधी बद्दल सांगायचं झालं तर ती खुप लोकप्रिय गायिका आहे. तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 32 वर्षीय निकिताने आताच 'टायगर 3' मधील 'लेके प्रभु का नाम' हे गाणे गायिले आहे.

यासोबतच 'राबता', 'आओ कभी हवेली पे' आणि 'पोस्टर लगवा दो' सारखी लोकप्रिय गाणीही गायली आहेत. 'जग्गा जासूस' चित्रपटात निकीताने अरिजित सिंगसोबत 'उल्लू का पट्टा' हे गाणे गायले होते जे खूप गाजले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT