Sa Re Ga Ma Pa Lil Champs: गौरी पगारे ठरली विजेती तर जयेश खरे... पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सा रे ग म प चा महाअंतिम सोहळा पार पडला. वाचा विजेत्यांची यादी
sa re ga ma pa little champs marathi winner list gauri pagare jayesh khare zee marathi
sa re ga ma pa little champs marathi winner list gauri pagare jayesh khare zee marathi SAKAL

सा रे ग म प लिटील चँम्प्स स्पर्धेचा काल महाअंतिम सोहळा काल दिमाखात पार पडला. गेली दोन - तीन महिने सा रे ग म प लिटील चँम्प्स शो झी मराठीवर सुरु आहे. अखेर या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा काल दिमाखात पार पडला.

सर्व स्पर्धकांपेक्षा वरचढ ठरत कोपरगावच्या गौरी पगाराने सा रे ग म प लिटील चँम्प्सच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. पाहा सा रे ग म प लिटील चँम्प्सच्या संपूर्ण विजेत्यांची यादी.

(Sa Re Ga Ma Pa Lil Champs Winner List)

sa re ga ma pa little champs marathi winner list gauri pagare jayesh khare zee marathi
Nikita Gandhi: जिच्या कॉन्सर्टमध्ये लोकांनी जीव गमावला अशी निकीता गांधी आहे तरी कोण?

सा रे ग म प लिटील चँम्प्सच्या संपूर्ण विजेत्यांची यादी

गौरी पगारेने सा रे ग म प लिटील चँम्प्सच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. गौरीचं सर्वांनी अभिनंदन केलंय.

याशिवाय श्रावणी वागळे उपविजेती ठरली असुन जयेश खरेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं ऋशीकेष ढवळीकर, देवांश भाटे आणि गीत बागडे यांनी. या सर्व स्पर्धकांवर अभिनंदनाचा वर्षाव झालाय.

गौरी पगारे ठरली विजेती, सर्वांना आनंद

गौरी पगारेने सा रे ग म प लिटिल चॅम्पसच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलंय. सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी मूळची कोपरगावची असून अत्यंत खडतर परिस्थितीतून लहान वयातच तिने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं.

गौरीची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. गौरी सा रे ग म प लिटिल चॅम्पस महाअंतिम सोहळ्याची विजेती झाल्याने महाराष्ट्रातील तमाम जनता तिचं अभिनंदन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com