kiran mane share experience that new wed couple meet him dr babasaheb ambedkar rajgruha SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: "जय भीम म्हणत त्यांनी..." किरण मानेंनी सांगितला राजगृहाबाहेर घडलेला भन्नाट किस्सा

किरण मानेंनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा खास अनुभव एकदा वाचाच

Devendra Jadhav

Kiran Mane News: किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. माने त्यांच्या आयुष्यात घडलेले विविध अपडेट्स शेअर करत असतात. अशातच किरण मानेंनी त्यांना आलेला एक भन्नाट अनुभव शेअर केलाय.

किरण मानेंना राजगृहाबाहेर भेटलेल्या एका नवविवाहीत जोडप्याचा अनुभव शेअर केलाय. हा अनुभव शेअर करुन माने लिहीतात, ...एक लै भारी घटना घडलेली तुमच्याशी शेअर करावी वाटतीय. राजगृहासमोर उभा होतो. तिथं नेहमी अनेक लोक राजगृहाच्या कुतुहलानं जमा झालेले असतात. तिथं मला बघितल्यावर "जय भीम किरण माने सर... एक सेल्फी द्या ना प्लीज" असं म्हणत गर्दी जमा व्हायला लागली...

किरण माने पुढे लिहीतात, "एक नवविवाहित जोडपं मागं घुटमळत होतं. सगळ्यांचे सेल्फी झाल्यावर त्यातला मुलगा माझ्याजवळ आला. म्हणाला, "सर, आम्हा दोघांना सेल्फी आणि आशिर्वाद द्या." मग मला कळलं की, दोन दिवस आधीच त्यांचा मंगल परीणय झाला होता. नवरीमुलगी पयल्यांदाच मुंबैला आली होती. तिची लै इच्छा होती की आपण सहजीवन सुरू करताना आधी जोडीनं 'राजगृहा'चं दर्शन घ्यायचं."

किरण माने पुढे लिहीतात, "संसार सुरू करण्यापुर्वी, जिथं बाबासाहेब-रमाई जोडीच्या वास्तव्याचा दरवळ आहे, तिथं दोघांनी मिळून तो अनुभवायचा !
म्हणून तो तिला तिथे घेऊन आला होता.
कस्लं भारीय हे भावांनो... कस्लं रोमॅंटिक !"

किरण माने शेवटी लिहीतात, "लै मस्त वाटलं. पंचवीशीतल्या त्या जोडीला आत्ता या वास्तूचं महत्त्व कळतंय... म्हणजे यांची पुढची पिढी आपल्या महामानवांच्या संघर्षाविषयी सजग असणार यात शंकाच नाही.

दोघांनाबी अगदी मनापास्नं सदिच्छा आणि काळजाच्या तळापास्नं लै लै लै प्रेम दिलं. 'राजगृहा'त येणं अशा पद्धतीनं 'साजरं' झाल्याच्या समाधानात मी परतीच्या प्रवासाला निघालो..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT