Salaar Movie Review: प्रभासच्या करिअरच्या बुडत्या नावेला 'सालार' तारणार! कसा आहे सालार? वाचा रिव्ह्यू

कसा आहे प्रभासचा सालार? वाचा हा रिव्ह्यू
salaar movie review starring prabhas Prithviraj Sukumaran Prashanth Neel Shruthi haasan
salaar movie review starring prabhas Prithviraj Sukumaran Prashanth Neel Shruthi haasanSAKAL

Salaar Review: साऊथच्या सिनेमाची सध्या खूप हवा आहे असं म्हणायला हरकत नाही. साऊथचे प्रत्येक सिनेमे बॉलीवूडला टक्कर देत आहेत. असाच आणखी एक सिनेमा बॉलीवूडला तगडी फाईट देणार यात शंका नाही. तो म्हणजे प्रभासचा 'सालार'. काय सिनेमा बनवलाय! मजा आली! आणि हो थिएटरमध्ये अनुभव जबराट आहे. सविस्तर वाचा आणखी गंमत सांगतो.

salaar movie review starring prabhas Prithviraj Sukumaran Prashanth Neel Shruthi haasan
Bigg Boss 17: सारखं सुशांतचं नाव घेऊन सहानुभूती कशाला? रुपाली भोसले अंकीतावर भडकली

प्रभासचा सालार रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत आहे. कारण सिनेमाचं नियोजन थोडं चुकलं होतं. काही दिवसांवर रिलीज असताना सालारचा ट्रेलर आला. याशिवाय शाहरुखच्या डंकी समोर टक्कर नको म्हणून सालारची रिलीज डेट पुढे मागे होत होती. पण अखेर सालार रिलीज झालाच. ज्यांना KGF, पुष्पा असे सिनेमे आवडले असतील त्यांना सालार नक्की म्हणजे नक्की आवडेल.

साऊथच्या सिनेमांमध्ये मारधाड असते. अशी सारखी ओरड बघायला मिळते. पण मित्रांनो! या ॲक्शनला जर तगड्या कथेची जोड असेल तर सिनेमा किती भारी होऊ शकतो याचं आणखी एक तगडं उदाहरण म्हणजे सालार. KGF चे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. प्रशांत यांनी छोटीशी कथा सिनेमास्कोप लेव्हलवर भव्यदिव्य केलीय. त्यामुळे पाहताना मजा येते. खूप दिवसांनी थिएटरमध्ये पब्लिकच्या उत्स्फूर्त टाळ्या - शिट्ट्यांचा माहोल ऐकायला मिळाला.

सालारच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर... भारतात १००० वर्षांपासून खानसार नावाचं एक राज्य आहे. या राज्याचे स्वतःचे नियम आहेत. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं पण त्यांना खानसारवर राज्य करता आलं नाही. (असं सिनेमात दाखवलंय) २०१० नंतर खानसार मध्ये सत्ता संघर्ष विकोपाला गेलाय. खानसार च्या खुर्चीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व घराणी एकवटली आहेत. याच राज्यात वाढलेले दोन जिगरी मित्र म्हणजे देवा (प्रभास) आणि वरदा (पृथ्वीराज). खानसारच्या सत्तासंघर्षात या दोन मित्रांची मैत्री कशी पणाला लागते? आणि खानसारमध्ये कोणाची सत्ता प्रस्थापित होते? याची एक रक्तरंजित कहाणी म्हणजे सालार.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे.. सालारचा अनुभव थिएटरमध्ये घेण्यासारखा आहे. तुम्ही म्हणाल की, OTT वर आल्यावर बघू. काय हरकत आहे! पण मोठ्या अनुभवाला तुम्ही मुकाल! सालारमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे मोठ्या पडद्यावर पाहताना अंगावर शहारे निर्माण करतात. काही प्रसंग पाहताना त्याचं पिक्चरायझेशन बघून दाद द्यावीशी वाटते. आणि महत्वाचं म्हणजे सिनेमा ग्रेट होण्यात बॅकग्राऊंड संगीताचा मोठा हातभार आहे. जबराट BGM मुळे थिएटरमध्ये एक मस्त माहोल निर्माण होतो.

salaar movie review starring prabhas Prithviraj Sukumaran Prashanth Neel Shruthi haasan
Salaar Twitter Review: दोन टोकाच्या दोन प्रतिक्रिया! नेटकऱ्यांना प्रभासचा 'सालार' कसा वाटला? एकदा वाचाच!

अभिनयाबाबत बोलायचं झालं तर प्रभासची ॲक्टिंग यथातथाच आहे. पण त्याला डायलॉगपेक्षा ॲक्शन करायची असल्याने त्याच्या अभिनय कौशल्यकडे नकळत कानाडोळा होतो. प्रभासने काही सीन्समध्ये प्रेक्षकांची खूप पसंती मिळवली आहे. त्याची एन्ट्री आणि ॲक्शन सीन्सला वाजणारं बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रभास सालारमध्ये चांगलाच भाव खाऊन गेलाय. आदिपुरूष, साहो अशा सिनेमांमुळे प्रभासची अपयशाची गाडी सालारमुळे पुन्हा रुळावर येईल यात शंका नाही. पृथ्वीराज, श्रुती हसन हे कलाकार सुध्दा त्यांच्या भूमिकेत ठीकठाक. इतर सर्वच कलाकारांनी सिनेमाचा विषय ओळखून चांगला अभिनय केलाय.

तर वाचकांनो! 2023 संपत आलाय. 2024 ची लवकरच सुरुवात येईल. थिएटरमध्ये वर्षाअखेरीस निखळ मनोरंजन देणारा अनुभव घ्यायचा असेल तर सालार हा बेस्ट ऑप्शन आहे. चुका काढायला जाल तर खूप निघतील. पण दोन घटका करमणूक होईल हे निश्चित. सकाळकडून सालारला साडेतीन स्टार. आणि हो! सुरुवातीची २० मिनिटं अजिबात चुकवू नका! धन्यवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com