Laal singh chaddha aamir khan movie news  esakal
मनोरंजन

Aamir Khan: आमिर आता 'महाभारता'वर बोलला! 'मला तर...'

आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा काही दिवसांत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र त्यापूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan Laal Singh Chaddha: आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा काही दिवसांत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र त्यापूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आमिरच्या या चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा असा (Bollywood Actor Aamir Khan) ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका या चित्रपटाला बसू शकतो असे सांगितले जात आहे. आमिरनं देश सोडून जाण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मोठा फटका त्याच्या या चित्रपटाला (bollywood news) बसू शकतो असे सांगितले जात आहे. त्यामुळे आमिरनं देखील आपल्या त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत प्रेक्षकांना आवर्जुन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. मी देश सोडून जाणार आहे किंवा मला भारताविषयी अजिबात प्रेम नाही. असे लोकांना का वाटते, असा प्रश्न आमिरनं करणच्या त्या शोमध्ये ट्रोलर्सला विचारला होता.

दुसरीकडे लाल सिंग चढ्ढामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या करिनानं देखील दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. यासगळ्य़ात आमिरनं करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये महाभारतावर प्रतिक्रिया दिली आहे, ती चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा अभिनेता आणि समीक्षक असणाऱ्या केआरके अर्थात कमाल खाननं लाल सिंग चढ्ढावर तीन राज्यांमध्ये बंदी असल्याचे ट्विट केले होते. त्यात युपी, एमपी, हरियाणासह आणखी काही राज्यामध्ये लाल सिंग चढ्ढाला विरोध होण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते.

आता आमिरनं एकापाठोपाठ वाद सुरु असताना महाभारतावरील कलाकृतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मी काहीही झालं तरी महाभारतावर चित्रपट तयार करणार, ते माझ्यासाठी एक यज्ञस्वरुप आहे. त्यामुळे केवळ कलाकृती म्हणून मी त्याच्याकडे पाहत नाही. माझ्यासाठी खूप काही मोलाचे योगदान त्या कलाकृतीत असणार आहे. असे आमिरनं म्हटले आहे. मी त्यापासून मागे हटणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. आमिरच्या त्या प्रतिक्रियेला सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यावेळी आमिरला ठग्स ऑफ हिंदोस्थान वरुनही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यानं उत्तर देणं टाळलं आहे.

महाभारतावर चित्रपट निर्मिती हा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जाते. त्याच्या निर्मितीवरुन तो म्हणाला, माझ्यादृष्टीनं तो काही चित्रपट नाही तर यज्ञ आहे. मोठा त्याग आहे. ती कलाकृती सादर करणं सोपं काम नाही. मी अजुनही त्यासाठी तयार नाही. त्यावर खूप विचार करतो आहे. महाभारत तुम्हाला निराश करत नाही तर तुम्हाला रोजच्या जगण्यात खूप प्रेरणा देणारे त्यात काही आहे. तुम्ही त्याचा शोध घ्या. असं आमिरनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT