Alia Bhatt: 'पुरुष पण आता बाळंत होणारेत!' आलिया पुन्हा बोलली|Bollywood Actress Alia Bhatt share comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt  news

Alia Bhatt: 'पुरुष पण आता बाळंत होणारेत!' आलिया पुन्हा बोलली

Bramhastra Movie News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या प्रेग्नंसीची बातमी सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळे त्या बातमीनं आनंदित झालेल्या चाहत्यांनी आलियावर (Bollywood Actress Aila And Ranbir) कौतूकाचा वर्षावही केला होता. दुसरीकडे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. आता आलियानं आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना परखड शब्दांत उत्तर दिलं आहे. ती काय म्हणाली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काही नेटकऱ्यांनी तर आलियाचे लग्न आणि तिचे बाळंतपण याचे दिवस मोजून तिला ट्रोल करण्याची हिंमत केली होती.

आलियानं ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे, दरवेळी आपण लोकांच्या गुड बुकमध्ये असो असे नाही. त्यामुळे आपण त्यांचा फारसा विचार न केलेला चांगला. लोकं तुम्ही काही केलं तरी तुम्हाला बोलणारच. मला आणि रणबीरला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल केले जाते. मला माझे कपडे, माझ्या घरचे, माझे चित्रपट यावरुन ट्रोल केले गेले आहे. याचा परिणाम माझ्यावर होतो हे त्या नेटकऱ्यांच्या गावीही नसते. अशावेळी मी त्यांना काय सांगु हा माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे. एका मुलाखतीमध्ये आलियानं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Viral Video: दोस्ती लई भारी ! चक्क माकड करतंय माणसाचं सांत्वन

आलिया म्हणते, मी काही पार्सल वगैरे नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या प्रेग्नंसीवरुन माझ्यावर टीका करता तेव्हा त्याचा बारकाईनं विचार करावा लागतो. माझी प्रेग्नंसी आहे. त्यामुळे ती कशाप्रकारे करायची हे तर मी ठरवू शकते ना, तसा मला अधिकार तर आहे ना, त्यामुळे नेटकऱ्यांनी चांगल्याप्रकारे विचार करण्याची गरज आहे. आता तर पुरुष देखील प्रेग्नंट राहतात. त्यामुळे दरवेळी बायकांवर टीका करण्याची काही गरज नाही. अशा शब्दांत सुनावले आहे. यापूर्वी देखील आलियानं तिला ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरले होते. येत्या महिन्यात आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा: Ranveer Singh: 'न्युड फोटोग्राफी' वरुन 14 वर्षे कोर्ट कचेरी करणाऱ्या मिलिंदचा पाठींबा

Web Title: Bollywood Actress Alia Bhatt Share Comment The Man Also To Have The Child Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..