late sushant singh rajput  
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन; विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांसह काही कलाकार मंडळी उपस्थित होती. वीस ते बावीस जणांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. त्याचे वडील के. के. सिंह यांनी त्याच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सुशांत सिंह राजपूत याने काल आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने सारा देश हळहळला. हिंदी चित्रपटसृष्टी निशब्द झाली. आज सकाळी त्याच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला.

आज दुपारी पटना येथून त्याचे वडील के. के. सिंह तसेच अन्य काही कुटुंबीय यांचे विमानाने येथे आगमन झाले. आज सकाळपासूनच कूपर रुग्णालयाबाहेर सुशांतच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी या गर्दीला आटोक्यात  आणले.  

त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने रुग्णालयात जाऊन त्याचे अंतिम दर्शन घेतले. सायंकाळी त्याचे पार्थिव रुग्णालयातून पवनहंस स्मशानभूमीत आणण्यात आले. तेथेही चाहत्यांनी गर्दी केली होती. 

स्मशानभूमीत त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी श्रद्धा कपूर, विवेक ओबेराय, क्रिती सेनन, वरुण शर्मा, उदित नारायण, रणवीर शौरी, दिनेश वीजन, पूजा चोप्रा आणि संजय निरुपम या मंडळीबरोबर काही टीव्ही कलाकारदेखील उपस्थित होते. पाऊस असल्यामुळे आणि त्यातच चाहत्यांची गर्दी झाल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती.  

last rights on sushant singh rajput did by his father 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT