esakal | का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bacchan and SSR

३४ वर्षांच्या त्या हसमुख चेहऱ्यामागे नेमकं काय दु:ख दडलं असेल याची कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाही. त्याने आत्महत्या का केली असावी असे विविध प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात येत आहेत आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लाॅगमध्ये त्याने आत्महत्या का केली हाच प्रश्न विचारला आहे.

का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त करीत आहेत. अख्खी चित्रपटससृष्टी स्तब्ध झाली आहे. यशाचं शिखर गाठत असताना अचानक त्याच्या मनात असा कसा विचार आला... ३४ वर्षांच्या त्या हसमुख चेहऱ्यामागे नेमकं काय दु:ख दडलं असेल याची कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाही. त्याने आत्महत्या का केली असावी असे विविध प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात येत आहेत आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लाॅगमध्ये त्याने आत्महत्या का केली हाच प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा: मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

 "का.. का.. का..? सुशांत सिंह राजपूत?"
 
तू दमदार कलाकार होतास. काहीच न बोलता, काहीच न मागता कायमचा निघून गेलास’.  ‘जितकं दमदार त्याचं काम होतं, त्याहून अधिक तल्लख त्याची बुद्धी होती. खोल अर्थ दडलेल्या कविता त्याने अनेकदा पोस्ट केल्या आहेत. त्या कवितांचा अर्थ समजून काही जण आश्चर्यचकीत झाले तर काही जण त्या शब्दांची ताकद समजण्यास असमर्थ राहिले.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

एम. एस. धोनी या चित्रपटाबद्दलही अमिताभ बच्चन यांनी लिहिलेले आहे. या चित्रपटातील सुशांतचे काम मी पाहिलेले आहे. मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा इंटरनॅशनल टुर्नामेंटमधला धोनीचा तो षटकार हुबेहूब कसा मारला याबद्दल कुतूहलतेने विचारलं. त्यावर सुशांतने उत्तर दिलं की त्याने धोनीचा तो व्हिडीओ १०० वेळा पाहिला होता. हीच त्याची कामाप्रती असलेली गंभीरता होती.

हेही वाचा: मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

अमिताभ बच्चन यांनी असा केला ब्लाँगचा शेवट:

अगदी शून्यापासून त्याची सुरावात झाली. तिथून ते आज तो ज्या ठिकाणी पोहोचला होता, ती कहाणीच सर्व काही सांगून जाते. एवढं सारं तुला मिळालं. त्यानंतरही आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो कुठून हे एक गूढच आहे.’, 

amitabh bacchan written blog on sushant singh rajput life 

loading image