Lata Mangeshkar Birth Anniversary News Lata Mangeshkar Birth Anniversary News
मनोरंजन

Lata Mangeshkar Birth Anniversary : लता दीदी आई-वडिलांचे पाय धुऊन प्यायच्या पाणी

आई-वडिलांचे पाय धुतलेले पाणी पिणारी मुलं आयुष्याची उंची गाठतात

सकाळ डिजिटल टीम

Lata Mangeshkar Birth Anniversary News स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची आज जयंती. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या वर्षीच आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लता मंगेशकर जितक्या अप्रतिम गायिका होत्या तितक्याच प्रत्येक नात्याला जपत होत्या. त्यांचे कुटुंबावर आणि आई-वडिलांवर खूप प्रेम होते. एवढेच नाही तर त्यांनी आई-वडिलांनाही देवाचा दर्जा दिला होता. बहीण आशा भोसले यांनी एकदा असा किस्सा सांगितला जे ऐकून सगळेच थक्क झाले.

‘एकदा मी आणि लता मंगेशकर यांनी ते पाणी पिले होते ज्याने आई-वडिलांचे पाय धुतले होते. लता दीदी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या आहेत. आई-वडिलांचे पाय धुतलेले पाणी पिणारी मुलं आयुष्याची उंची गाठतात, असे लता दीदी म्हणायच्या’ असे आशा भोसले (Asha Bhosle) यांनी सांगितले होते.

एके दिवशी आम्ही कोल्हापुरात मुक्कामाला असताना लता दीदी (Lata Mangeshkar) यांनी मला एक वाट्यात पाणी आणायला सांगितले. यानंतर त्यांनी ते पाणी झोपलेल्या आई-वडिलांच्या पायावर ओतले. यानंतर आम्ही ते पाणी आमच्या तळहातात घेतले आणि प्यायलं, असेही आशा यांनी सांगितले.

कोणीतरी आम्हा दोघांना लग्नात गाण्यासाठी बोलावले होते. लग्नात गाण्यासाठी आशा भोसले व लता मंगेशकर यांची गरज असल्याचे म्हटले होते. दीदींनी विचारले लग्नात गाणं गाणार का? मी नकार दिला. त्यानंतर त्यांनी समोरच्याला नकार दिला. तुम्ही आम्हाला १०० मिलियन डॉलर्स दिले तरी आम्ही लग्नात गाणार नाही. कारण, आम्ही लग्नात गात नाही, असे लता दीदी म्हणाल्याची आठवण आशा भोसले करून दिली होती.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या नावाने लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार राष्ट्र, लोक आणि समाजासाठी उत्कृष्ट आणि कधीही न विसरता येणारे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT