dr madhuri kanitkar on kangna urmila 
मनोरंजन

'कंगना तुझी लाज वाटते', लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांचं 'ते' ट्विट फेक

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रनौत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. कंगनाने उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्न स्टार असा उल्लेख केल्यानंतर या वादाला आणखी तोंड फुटलं आहे. काहीजण कंगनाचं समर्थन करत आहेत तर काहींनी कंगनाला तिच्या या विधानावरुन आदराने बोलण्याचे सल्ले दिले आहेत. अनेक स्तरांतून यावर प्रतिक्रिया उमटत असताना लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांचं एक ट्विट देखील व्हायरल होत होतं.

डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगनाला 'तुझी लाज वाटते' अशा आशयाचं ट्विट केलं होतं मात्र हे ट्विट फेक असल्याचं आता समोर येत आहे. व्हायरल झालेल्या या ट्विटमध्ये डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगनाला विरोध दर्शवत उर्मिलाची बाजु घेतल्याचं दिसून आलं होतं. या ट्विटसोबतंच कंगनाचा उर्मिलाविरोधात विधान करणारा व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. 

डॉ. माधुरी कानिटकर यांच्या नावाने करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये म्हटलं गेलं होतं की, 'कंगना रनौत तुझी लाज वाटते, मी सहसा कुणाबाबत अशी प्रतिक्रिया देत नाही मात्र एक महिला म्हणून मला यामुळे खूप वेदना झाल्या आहे. उर्मिला मातोंडकरजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.'

कंगनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'मला स्वतःवर विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यासोबत समझौता केला नाही. माझ्यावर जो काही दबाव टाकला गेला त्याला मी बळी पडली नाही. मला तिकीटासाठी जास्त काम करावं लागलं नाही. ती माझ्या संघर्षाची मस्करी करत आहेत. ती स्वतः एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती स्वतःच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही.' कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन सर्व स्तरावर पडसाद उमटत आहेत.  

maharashtras first lady lieutenant general dr madhuri kanitkar reaction on kangana and urmila  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मी मुंबईत नसणार, पण... वाढदिवसाआधी राज ठाकरेंचं मोठं आवाहन; कार्यकर्त्यांना दिला खास संदेश, पोस्टमध्ये काय लिहिलं?

'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

Pune Metro Issue : मेट्रो स्थानके यार्डातच! हिंजवडी-बाणेर मार्गावरील स्थानकांची कामे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

SCROLL FOR NEXT