अभिनेते कमल हासन यांनी त्यांच्या २३२ व्या सिनेमाची केली घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 17 September 2020

या सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत ते स्वतः दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी अशा एका दिग्दर्शकावर सोपवलं आहे ज्यांना कमल हासन यांचा फॅनबॉय म्हणण्यावर गर्व आहे.

मुंबई- अभिनेते कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी आहे. निर्माता असलेल्या कमल हासन यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत ते स्वतः दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी अशा एका दिग्दर्शकावर सोपवलं आहे ज्यांना कमल हासन यांचा फॅनबॉय म्हणण्यावर गर्व आहे. या सिनेमाचं नाव सध्या 'केएच २३२' असं ठेवलं असल्यातं कळतंय.  

हे ही वाचा: ड्रग प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची हायकोर्टात धाव, 'या' गोष्टीसाठी केलं अपील   

जेम्स बॉन्ड सिरिजची नावं जेव्हा त्यांच्या प्रोजेक्टच्या संख्यांच्या नावाने सुरु केले तेव्हा अनेक देशांमध्ये हाच पायंडा दिसून आला. अभिनेता प्रभासनंतर कमल हासन यांनी त्यांच्या सिनेमाचं नाव सांगण्याऐवजी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील २३२ वा सिनेमा आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता कमल हासन या सिनेमात दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्यासोबत काम करणार आहेत. लोकेश कमल हासन यांचे आधीपासूनंच चाहते आहेत. या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन अनिरुद्ध करणार आहेत. तसंच या सिनेमाची निर्मिती स्वतः कमल हासन त्यांच प्रोडक्शन हाऊस 'राज कमल फिल्म इंटरनॅशनल'द्वारे करणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Another journey begins

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan) on

कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी 'कलाथुर कन्नमा' या पहिल्या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलेलं. यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. आता हा सिनेमा त्यांच्या करिअरचा २३२ वा सिनेमा आहे. ६५ वर्षांचे असणारे कमस हासन शेवटचे 'विश्वरुपम २' या सिनेमात दिसून आले होते. त्यांचा प्रसिद्ध सिनेमा 'इंडियन'च्या सिक्वेलवरही लवकरंच काम सुरु केलं जाणार आहे.   

kamal haasan announced his 232nd film with master director lokesh kanagara  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamal haasan announced his 232nd film with master director lokesh kanagara