Mahesh Babu Guntur Kaaram Movie Dum Masala Song  esakal
मनोरंजन

Dum Masala Teaser : बॉलीवूडमध्ये त्याच्या तोडीचा कुणी नाहीच! 'दम मसाला' पाहून बसेल झटका

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हा त्याच्या एका चित्रपटाच्या टीझरमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Mahesh Babu Guntur Kaaram Movie Dum Masala Song : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू हा त्याच्या एका चित्रपटाच्या टीझरमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. गुंटूर करम नावाच्या चित्रपटामध्ये तो झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आता महेश बाबूच्या गुंटूर करम मधील दम मसाला नावाचे गाणे समोर आले आहे. त्याचा टीझर व्हायरल झाला असून त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यापूर्वी महेश बाबूनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये आपण कधीही बॉलीवूडमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्याचे कारण आपले मानधन बॉलीवू़डला परवडणारे नाही. असे म्हटले होते. त्यावरुन मोठा वाद झाला होता.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप आणि उत्तर भारतात धक्के असं का?

साऊथमध्ये महेशच्या नावाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याची लोकप्रियता मोठी आहे. अशावेळी महेश बाबूचा कोणताही चित्रपट येण्याचा अवकाश चाहत्यांचा त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे. आता त्याच्या नव्या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. यावेळी त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, बॉलीवूडमध्ये तुझ्या तोडीचा अभिनेता नाहीच.

त्रिविक्रम श्रीनिवास यांनी गुंटूर करमचे दिग्दर्शन केले असून तो १३ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात महेश बाबू बरोबरच श्रीलिला, मीनाक्षी चौधरी, जगपति बाबू, राम्या कृष्णन, जयराम, प्रकाशराज आणि सुनील यांच्या भूमिका आहेत.

यापूर्वी महेशनं त्याचे दिवंगत वडील अभिनेता कृष्णा यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुंटूर करमचे गाणे आणि टीझर व्हायरल केला होता. त्या टीझरमध्ये महेश बाबू स्मोकिंग करताना दाखवण्यात आला होता. हातात छडी घेऊन तो मिर्ची यार्डमध्ये लढाई करण्यास सज्ज होतो. अशावेळी त्याचा तो लूक भलताच लोकप्रिय झाला होता. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. हायली इनफ्लेबल च्या धर्तीवर त्याचा लूक व्हायरल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT